प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर पुलिया बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी
सोमवार, 25 मई 2026
Comment
. खासदार डॉ.नामदेव किरसान पाहनी करतांना
• दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
गडचिरोली :- प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या तळोधी – कुणघाडा – पावीवसनपेट मार्गावरील पुलिया बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत बांधकाम दर्जेदार, टिकाऊ व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमध्ये कोणतीही निष्काळजीपणा होऊ नये तसेच गुणवत्तेशी तडजोड करता कामा नये, असे स्पष्ट निर्देश खासदार डॉ. किरसान यांनी यावेळी दिले.
सदर पुलिया बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील अनेक गावांचा संपर्क अधिक सुलभ होणार असून नागरिकांना वाहतुकीची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माधव गावड, संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर पुलिया बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी"
एक टिप्पणी भेजें