-->
संजय गांधी निराधार योजनेची मासीक बैठक 5 ते 6 , महिन्यांपासून झाली नाही,याचे कारण काय?.

संजय गांधी निराधार योजनेची मासीक बैठक 5 ते 6 , महिन्यांपासून झाली नाही,याचे कारण काय?.


विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड :- आज सहा महिन्यांपासून संजय गांधी निराधार ची बैठक घेतली नाही,दर एक ते दोन महिन्यांत बैठक घेण जरुरी असताना कोणत्या कारणाने एवढा विलंब झाला याच स्पष्टिकरण द्यावे तहशिलदार साहेबांनी आज दिव्यांग हा दुर्बल घटक आपल्या आर्थिक परिस्थितीशी लढत आहे, त्याला कुटूंबाचा उदर निर्वाह करणे कठीण होतं आहे त्याला अशा परिस्थितीत तहशिल च्या चकरा माराव्या लागत आहे त, उन्हातान्हात आणि दुसरी बाब दिव्यागांना शाळा सोडल्याचा दाखला टी,सी,ही अट घालण्यात आली, वृद्ध श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, मधील वृद्धांना, विधवा निराधार महिलांना ही ही जाचक अटी घालण्यात आल्या हे किती बरोबर आहे, कारण वृद्ध,दिव्यांग,हे शाळा शिकलेच नाहीत त्यांनी शाळेचा दाखला कुठून आणायचा आणि जरि काही ज्येष्ठ नागरिकांनी शाळा शिकलीही असेल,ती शाळाच ठिकाण्यावर नाही,दाखला कुठून आणायचा,हा विचार कधी शासनाने केला का! अशा जाचक अटी घालून वृद्ध,दिव्यांग, निराधार लोकांना नाहक त्रास देत आहेत,आज सहा महिन्यांपासून जी संजय गांधी निराधार योजना ची बैठक घेऊन 15,दिवसात अर्ज निकाली नाही काढले तर सर्व अर्जदार दिव्यांग, वयोवृद्ध,विधवा, आणि सामाजिक कार्यकर्ता,व प्रहार दिव्यांग संगठन नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष, विजय चौडेकर, प्रहार शिवसेना स्टाईलने संगायो शहरी विभागात घेराव घालतील याची चौकशी वरिष्ठ अधिकारी D,S,O, साहेब,मा,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांनी करावी ,

0 Response to "संजय गांधी निराधार योजनेची मासीक बैठक 5 ते 6 , महिन्यांपासून झाली नाही,याचे कारण काय?."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article