३ लाखांचा सडवा मोहापास केला नष्ट..
सोमवार, 1 जून 2026
Comment
• ऑपरेशन फ्लॅश आउट :- गोबरवाही पोलिसांची मोठी कारवाई.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर/गोबरवाही :- जिल्ह्यात शनिवारी 'ऑपरेशन फ्लॅश आउट' राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये धडक कारवाई करत पोलिसांनी तब्बल १,९०० किलो सडवा मोहपास जप्त करून नष्ट केला. या मालाची एकूण किंमत ३ लाख ९ हजार रुपये आहे.
गोबरवाही पोलिसांनी या मोहिमेदरम्यान ४ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाया केल्या. यामध्ये एका ठिकाणी ८०० किलो सडवा मोहपास जप्त
करण्यात आला. तसेच इतर तीन ठिकाणी क्रमशः ७०० किलो, ३०० किलो आणि १०० किलो सडवा जप्त करण्यात आला. पोलिसांनी या चारही कारवायांमध्ये एकूण १,९०० किलो सडवा मोहपास घटनास्थळावरच नष्ट केला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गिते, पोलिस उपनिरीक्षक रोडे, पोलिस हवादार कडव, गेडाम, शिपाई कांबळे, गायधने, ठाकरे, गभने, पटले आणि काहालकार यांनी पार पाडली.
0 Response to "३ लाखांचा सडवा मोहापास केला नष्ट.."
एक टिप्पणी भेजें