तुमसर-रामटेक मार्गावरील अपघात प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
सोमवार, 1 जून 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- रामटेक-तुमसर मार्गावरील काटेबाम्हणी
जवळ शुक्रवारी सायंकाळी भरधाव कारने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तुमसर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
का टे बाम्हणी येथील भगवान कचरू आगाशे (वय ३८) हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या जनावरांसाठी चारा आण ण्या क रिता गेले होते. ते रस्ता ओलांडत असताना रामटेककडून तुमसरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका पांढऱ्या अर्टिका कारने (क्रमांकः एमएच १५/ ईपी ९२५२) काटेबाम्हणी गावाजवळ भगवान यांना जोराची धडक दिली. या कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता आणि चालक निष्काळजीपणे वाहन चालवत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीकडून समोर आली आहे. या धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की, भगवान आगाशे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर तुमसर पोलिसांनी आरोपी चालक अनुपम श्रीराम डहारे (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मुंढे करत आहेत.
0 Response to "तुमसर-रामटेक मार्गावरील अपघात प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल."
एक टिप्पणी भेजें