तुमसर,मोहाळी तालुका वासियांच्या 'ताटात' केमिकलयुक्त पनीर ?..
मंगलवार, 2 जून 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त निधीप्रति
तुमसर/मोहाळी :- सध्या आपल्यापैकी अनेकांच्या ताटात जे पनीर आपण अतिशय आनंदाने आणि पौष्टिक म्हणून खातो, तेच पनीर आता शरीरासाङ्गी' स्लो पॉयझन' चरत आहे. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात अस्सल पनीरच्या नावाखाली केमिकलयुक्त' पनीरचा जो गोरखधंदा फोफावला आहे, तो केवळ एक व्यापार नसून थेट नागरिकांच्या जिवाशी खेळला जाणारा क्रूर प्रकार आहे.
दिसायला अस्सल, चवीला हुबेहूब आणि रंगाला पांढरे शुभ्र... पण हेपनीर म्हणजे केवळरसायनांचेएक मिश्रण आहे. नफा कमावण्याच्या हव्यासापोटी हॉटेल्स, ढाबे आणि मोङ्गया समारंभांमध्ये स्वस्त दरात मिळणाऱ्या या कृत्रिम पनीरचा वापर केला जात आहे. सामान्य ग्राहकाला तर यातला फरक ओळखणेही आता अशक्य झाले आहे. या पनीरमध्ये दुधाचा अंश
नगण्य असतो, तर पाम ऑइल, हायड्रोजनेटेड फॅट्स आणि घातक रसायनांचा भडिमार असतो. हे कृत्रिम पनीर म्हणजे शरीरासाङ्गीएक' सायलेंट किलर' आहे. यामध्येवापरली जाणारीरसायनेपचायला अत्यंत जड असतात, ज्यामुळे तीव्र अॅसिडिटी, गॅस आणि अपचनाचा त्रास होतो. निकृष्ट दर्जाच्या तेलांच्या वापरामुळे कोलेस्टेरॉलची पातळी अचानक वाढते, जे थेट हृदयविकाराला आमंत्रण देते.
पनीर पांढरे दिसण्यासाङ्गी वापरले जाणारे केमिकल्स दीर्घकाळ सेवन केल्यास यकृत आणि किडनी निकामी होण्याचा, इतकेच काय तर कर्करोगासारखे गंभीर आजार जडण्याचा धोका असतो. जेव्हा केंद्र सरकार आणी राज्य सरकार अन्न औषध प्रशासन विभाग कृत्रिम पनीरवर कडक निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे, तेव्हा तुमसर-मोहाडीतील
अन्न व औषध प्रशासन अजूनही 'डीप स्लीप' मध्ये का आहे? बाजारात सर्रास चाललेला हा भेसळीचा प्रकार प्रशासनाच्या नजरेतून कसा सुटू शकतो? की यामागे काही साटेलोटे आहे? असा सवाल आता सामान्य जनता करत आहे. केवळ कारवाईच्या गप्पा न मारता, तातडीने छापे टाकून नमुने प्रयोगशाळेत पाङ्गवणे ही काळाची गरज आहे. येथे पनीरच्या नावाने विष विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. आपले आरोग्य हे आपल्या मुलाबाळांचे भविष्य आहे, ते काही रुपयांच्या नफ्यासाङ्गी पणाला लावू नका. अन्न व औषध प्रशासनाने आता 'अॅक्शन मोड मध्ये येऊन या गोरखधंद्याला कायमचे टाळे लावावे, अन्यथा होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाचीच असेल!
0 Response to "तुमसर,मोहाळी तालुका वासियांच्या 'ताटात' केमिकलयुक्त पनीर ?.."
एक टिप्पणी भेजें