तलाव खरेदी करून सोडवला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न..
मंगलवार, 2 जून 2026
Comment
• गुमाधावडा ग्रामपंचायतीचा पुढाकार..
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
तिरोडा :- उन्हाळ्यात गावात निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी गुमाधावडा ग्रामपंचायत यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तलाव खरेदी केला आहे. गावातील नागरिक तसेच पाळीव प्राण्यांच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
गुमाधावडा येथे असलेला खासगी तलाव सुमारे २ एकर ३२ आर क्षेत्रात आहे. यापूर्वी गावाला कोणत्याही पाणीपुरवठा योजनेचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे ग्रामपंचायतने स्वतः पुढाकार घेत तलाव खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली. तलाव खरेदीसाठी एकूण सुमारे २७ लाख ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यापैकी अदाणी
फाउंडेशनच्या वतीने १२ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. उर्वरित निधी ग्रामपंचायत व लोकसहभागातून उभारण्यात येत आहे.
या तलावामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होणार असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी अदाणी फाउंडेशनचे प्रमुख बिमूल पटेल, सरपंच पद्मा विभूल पटले, उपसरपंच सहादेव बिन्ने, कमलनाथ पप्पे, सुरीला चौधरी, प्रमिला पटले, पन्नू पटले, बाबूलाल पटले, लालसिंग पटले, जैराम रहांगडाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Response to "तलाव खरेदी करून सोडवला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न.."
एक टिप्पणी भेजें