-->
साहित्यिकांच्या हस्ते झाला साहित्य संमेलनास उपस्थित श्रोत्यांचा सन्मान

साहित्यिकांच्या हस्ते झाला साहित्य संमेलनास उपस्थित श्रोत्यांचा सन्मान


• सन्मान श्रोत्यांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमाची साहित्य संमेलनातून सुरुवात

• सन्मान श्रोत्यांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमाची जनमाणसात चर्चा
 
अमरावती न्यूज नेटवर्क 

शब्दास्त्र विचार मंच, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल
 ट्रस्ट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने,बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृती दिनानिमित्त तसेच स्मृतीशेष सुखदेवराव तिडके, स्मृतीशेष सूर्यभानजी मेश्राम यांच्या स्मृती दिनानिमित्त,चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह भीम टेकडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.या पार पडलेल्या साहित्य संमेलनातून सन्मान श्रोत्यांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुठल्याही कार्यक्रमाला शोभा श्रोता वर्गाशिवाय येत नाही.मात्र तोच श्रोता वर्ग हा सन्मानापासून दूर असतो.हेच हेरून साहित्य संमेलनास उपस्थित नंदकिशोर पाटील,आनंद मेश्राम ,विनोद कावरे,नारायण थोरात, अमोल माहोरे,प्रतिभा मेश्राम,वासुदेव गोसावी,गणेश थोरात,अरुण गावंडे,राजेश वैद्य,नंदकिशोर वानखडे, अनिल पाटील,विठ्ठल तंतरपाळे,विकास डोंगरे, कमलाताई नंदागवळी,रचना कांबळे,दिनेश मेश्राम,दिनेश टेंभुर्णे,राष्टपाल घरडे,शैलेश मेश्राम,संजय डोंगरे,चंदन नाईक,सुनीता रायबोले,ताराचंद करवाडे, नंदू साळवे,विकास इंगळे,रघुनाथ तेलमोरे, प्रीतेश तेलमोरे,एकनाथ मंडवधरे,निलेश तागडे,इकबाल जावेद अली,गुणवंत रंगारी ,विजय पाटील,अशोक गणवीर, ज्ञानेश्वर मेश्राम,वसंत नाईक, दिगंबर मेश्राम,अशोक रामटेके,प्रकाश अंभोरे,शेषराव शिरसाट, ज्ञानेश्वर पांडे,अरुण रामटेके, स्वराग सूर,नारायण मेंढे,उत्तमराव गवई, के.के.देशभ्रतार, जगनराव मोरे,विवेक शहारे,सुदर्शन धाकडे,दिनेश पाटील,नागदिवे सर ,दिनेश मेश्राम , उर्जा कांबळे,सुनीता डोंगरे,चंदाताई मेश्राम यांच्यासह अन्य श्रोत्यांचा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अनंता सूर (आंबेडकरी अभ्यासक),उद्घाटक सुषमा पाखरे (आंबेडकरी साहित्यिका),स्वागताध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.गोपीचंद मेश्राम,प्रमुख पाहुणे प्रा.मुकुंद भारसाकळे,प्रा. डॉ वसंत शेंडे (साहित्यिक),प्रा डॉ.रविकांत महिंदकर,प्रा.अरुण बुंदेले यांच्या हस्ते तसेच परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक रमेशचंद्र कांबळे,मुख्य संयोजक, शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे,संयोजक प्रा.देवानंद पाटील, विद्रोही अविनाश गोंडाणे,पद्माकर मांडवधरे,दिलीप शापामोहन,चरणदास नंदागवळी,समाजभूषण टी .एफ.दहीवाडे यांच्या उपस्थित पंचशील दुप्पटा ,सन्मान पत्र,पुष्पगुच्छ देऊन साहित्य संमेलनास उपस्थित श्रोत्यांचा सन्मान करण्यात आला.

0 Response to "साहित्यिकांच्या हस्ते झाला साहित्य संमेलनास उपस्थित श्रोत्यांचा सन्मान"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article