-->
तुमसर तालुक्यात दुधाच्या गुणवत्तेची तपासणी.

तुमसर तालुक्यात दुधाच्या गुणवत्तेची तपासणी.

• गुटखा माफियाविरुद्ध गुन्हा दाखल.

• अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र सुरू.

         हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर :- जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आ ठवड्यापासून जिल्ह्यात भेसळयुक्त, निकृष्ट आणि प्रतिबंधित अन्न पदार्थांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत तुमसर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे बेकायदेशीर व प्रतिबंधित अन्न पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न

१७ हजारांचा पानमसाला, गुटखा जप्त

या कारवाईतील सर्वात मोठी कारवाई प्रतिबंधित गुटख्यावर झाली. तुमसर येथून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि खर्रा तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशिनरी तसेच तब्बल १७ हजार १८१ रुपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तुमसर पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध एफआयआर (गुन्हा) नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने तुमसर तालुक्यात ही कारवाई केली.

यात पथकाने तुमसर तालुक्यातील विविध दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादक पेढ्यांची अचानक तपासणी केली. आरोग्याशी खेळ केला जाऊ नये यासाठी संशयास्पद दुग्धजन्य पदार्थांचे नमुने संकलित करून ते

पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी सर्वेक्षण करून संबंधितांना सुधारणा नोटिसा बजावल्या असून कडक ताकीदही दिली आहे.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पूजा बोरकर आणि पूनम तुरकर यांच्या

तुमसर : डेअरीतील दुधाची तपासणी करताना अन्न सुरक्षा अधिकारी पूजा बोरकर, पूनम तुरकर.

पथकाने केली. या कारवाई दरम्यान कंत्राटी वाहन चालक तुषार वाडीभस्मे यां चीही उपस्थिती होती. सार्वजनिक आरो ग्याशी तडजोड करणा ऱ्या

आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री कर णाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कार वा ई सुरू राहील, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

0 Response to "तुमसर तालुक्यात दुधाच्या गुणवत्तेची तपासणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article