-->
खराशी ग्रामपंचायतचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज समीती व्दारा मूल्यांकन.

खराशी ग्रामपंचायतचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज समीती व्दारा मूल्यांकन.


समीतीने केली विकास कामांची तपासणी.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
    वृत्तपत्र प्रतिनिधी 

 पालांदूर :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नियुक्त केलेल्या विशेष मूल्यांकन पथकाने ४ जून रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी गावाला भेट दिली.यावेळी समीतीने गावातील विकास कामांची व प्रशासकीय पारदर्शकतेची तपासणी केली. गावांचा सर्वांगीण विकास मोजण्या साठी आलेल्या या चमूत अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश होता. यात समितीचे अध्यक्ष तसेच वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोद्रे, पाणी व स्वच्छता समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील, वृत्तपत्र प्रतिनिधी यशवंत

हिवराळे, विस्तार अधिकारी प्रमोद लोखंडे, प्रफुल्ल इटाळ, उज्वल पुरी आणि रंजित राऊत यांचा समावेश होता. विकास कामांची व प्रशासकीय कामकाजाची सखोल पाहणी केली. चमूने ग्रामपंचायत अंतर्गत शाळा, अंगणवाडी, व्यायाम शाळा, सार्वजनिक शौचालय, वाचनालय, घरकुल, , उपसरपंचश्री टिकेश्वर मेश्राम, पाणंद रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व स्वच्छता सोबतच नाविन्यपूर्ण कामकाजा बाबत सखोल चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी केल यावेळी उपस्थित सरपंच श्री योगराज झलके ग्रामपंचायत अधिकारी श्री डिरीश भोतमांगे व स्थानिक कर्मचाऱ्यांनी विकास कामांची, योजनांची तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून होत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती चमूसमोर सादर केली. याप्रसंगी लाखनीचे गटविकास

अधिकारी संदीप पानतावणे, संजय नागोशे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयं सेविका, ग्राम रोजगार सेवक, बचत गटाच्या महिला, डाटा एंट्री ऑपरेटर, याच्या सह अधिकारी कर्मचारी, व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी समीतीने आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, डिजिटल सुविधा आणि महिला व बालविकास विभागांतर्गत , प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांची, लोकसहभा सह नाविन्यपूर्ण उपक्रमाची' ऑन ग्राउंड' पाहणी केली पदाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पथकासमोर गावाच्या प्रगतीचा पाढा वाचला. केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता, ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून गावाने स्वच्छता, दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये कशी झेप घेतली, याचे सादरीकरण

0 Response to "खराशी ग्रामपंचायतचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज समीती व्दारा मूल्यांकन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article