वर्ल्ड रेकॉर्ड' विजेता देवांशची पोलीस अधीक्षकांकडे सदिच्छा भेट.
गुरुवार, 18 जून 2026
Comment
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- अवघ्या ४४ सेकंदांत डोळ्यांवर पट्टी बांधून जगातील विविध देशांचे चलन व नाणी अचूक ओळखत 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड' प्रस्थापित करणाऱ्या लाखांदूर येथील बालक देवांश शिवशंकर कलंत्री याने १७ जूनला भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत देवांशने पोलीस अधीक्षकांसमोर आपल्या 'मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन' कौशल्याचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. डोळे झाकलेले असतानाही वस्तू व चलन ओळखण्याची त्याची अद्भुत क्षमता पाहून पोलीस अधीक्षकांनी त्याचे कौतुक केले. या प्रशिक्षणपद्धतीबाबत माहिती घेतली. पोलीस अधीक्षकांनी देवांशला पुष्पगुच्छ देऊन भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याचे वडील शिवशंकर कलंत्री उपस्थित होते. देवांशच्या यशामुळे लाखांदूरसह संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
0 Response to "वर्ल्ड रेकॉर्ड' विजेता देवांशची पोलीस अधीक्षकांकडे सदिच्छा भेट."
एक टिप्पणी भेजें