-->
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दगडफेक व बौद्ध समाजातील तरुणांना शस्त्राने मारहाण प्रकरणी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दगडफेक व बौद्ध समाजातील तरुणांना शस्त्राने मारहाण प्रकरणी.





अकोला जिल्हा पोलीस कार्यालयावर सम्राट अशोक सेनेचे आकाश दादा शिरसाट यांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चाचे केले होते आयोजन.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
अकोला :- आज दिनांक 18 जून 2026 ला सकाळी 11.30 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचे सम्राट अशोक सेनेचे आकाश दादा शिरसाट यांच्या नेतृत्वात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोला जिल्ह्यातील
बाभुळगाव येथील बौद्ध विहारावर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर ,मूर्तीवर ,दगडफेक केली तसेच बौद्ध समाजातील तरुणांना शस्त्राने मारहाण केली. या घडलेल्या घटनेच्या विरोधात अकोला अशोक वाटिका ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत जन आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात बाभुळगाव गावातील शेकडो महिला, तरुण, जेष्ठ नागरिक व सर्व गावकरी मंडळी तसेच अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी ,कार्यकर्ते ,मोठ्या संख्येने उपस्थित होऊन बुद्ध विहारावर महामानवांच्या मूर्तीवर दगडफेक करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्व रस्त्यावर उतरले होते.हातात संविधानाचे फलक व महामानवांचे प्रतिमा घेऊन जय भीम चे घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. आरोपीला तात्काळ अटक करण्यात येऊन त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोर्चात सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाश दादा शिरसाट एडवोकेट आकाश भाऊ हिवराळे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई ,बीजेपीचे नगरसेवक सिद्धू उपरवट ,बौद्ध संघर्ष समितीचे जीवन दिघे ,अश्वजीत शिरसाट, सनी सरदार, सागर इंगळे, सम्यक डोंगरे, यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले .यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष व युवक सहभागी झाले होते.

आंदोलनाची दखल न घेतल्यास व गुन्हेगाराला त्वरित अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.

0 Response to "डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा दगडफेक व बौद्ध समाजातील तरुणांना शस्त्राने मारहाण प्रकरणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article