सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते श्री सतीश रावजादे यांजकडून संगीतकारश्री शिवराज साने यांचा सत्कार.
मंगलवार, 9 जून 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्युज नेटवर्क
उरळीकांचन :- दैवत माझे मल्हारी व अंत्येष्टी या चित्रपटातील सदाबहार अभिनेते श्री सतीश राजवादे यांनी ऊरूळी कांचन येथील संगीतकार श्री शिवराज साने सर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पद्मश्री डॉ मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले. शिवराज साने यांनी महाराष्ट्र मध्ये त्यांच्यासोबत आठ वर्ष संगीतकला क्षेत्रात व सामाजिक पथनाट्ये मध्ये काम केलेले आहे. खुद्द श्री सतीश राजवादे हे अभियानयाबरोबर शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. हा स्पर्श मायेचा, स्वर्गावर स्वारी, महानाट्य 'जाणता राजा ' अशा नाटकांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. समाजभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. अशा सन्माननिय व्यक्तींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा व सन्मान मिळणे हा साने सरांच्या कार्याचा बहुमान आहे अशी भावना परीसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सम्राट बहुउद्देशी जनजागृतीसंस्थेच्या अध्यक्षा सौ रेखा शिवराज साने तसेच ऊरुळी कांचन, कुंजीरवाडी, लोणी काळभोर संगीत क्लासेसचे विद्यार्थी तसेच मित्र परिवार नातेवाई पत्रकार वार्ताहर बंधू भगिनींनी शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
0 Response to "सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते श्री सतीश रावजादे यांजकडून संगीतकारश्री शिवराज साने यांचा सत्कार."
एक टिप्पणी भेजें