प्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी - माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे.
मंगलवार, 9 जून 2026
Comment
• पहेला ( भंडारा ) येथे "सन्मान द्या सन्मान घ्या" पत्रकार संजीव भांबोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम संपन्न.
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा ( मंगळ. ०९ जून ) ला भंडारा तालुक्यातील पहेला येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे म्हणाले की, "आजच्या काळात निर्भिड पत्रकारीच करावी, आज जर सोशल मिडीया नसता तर जग एक पाऊल पुढे नसते, म्हणून सामाजिक प्रसारमाध्यमांवर आज भारतात विशेष लक्ष दिले जात आहे" असे प्रभावशाली प्रतिपादन केले.
पहेला ( भंडारा ) येथे संपादक, ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त "सन्मान द्या सन्मान घ्या" हा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मंचावर उदघाटक दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे , छत्रपती संभाजीनगरचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, विशेष अतिथी चित्रपट अभिनेते अश्विनकुमार वघाले, अभिनेत्री चैताली भस्मे, प्रसिद्ध नृत्यांगना वैशाली मडावी, माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, व अभिष्टचिंतन सत्कारमूर्ती संजीव भांबोरे, मराठवाड्यातील फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक सोनवणे, अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश पारधी,आदी मान्यवर हजर होते. येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, गुणवंत विद्यार्थी, पत्रकार, प्रबोधनकार, महिला सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी खा. डॉ. खुशाल बोपचे म्हणाले की, आजच्या भयंकर गैरव्यवहारीय, भ्रष्टाचार फोफावलेल्या काळात निर्भिड पत्रकारीच करावी. आज जर सोशल मिडीया नसता तर जग एक पाऊल पुढे नसते. एका सेकंदात जागृत नागरिक सोशल मिडीयातून अन्याय, गैरव्यवहार, भ्रष्टाचार जनतेसमोर उघडकीस करीत आहे" असे प्रभावशाली प्रतिपादन केले. यावेळी संपादक संजीव भांबोरे म्हणाले की, हा कार्यक्रम माझा एकट्याचा नाही, तर माझ्या वाढदिवसाला गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्तव्यदक्ष अधिकारी ,कर्मचारी , प्रबोधनकार,कवी,हे सन्मानित झाले पाहिजे असे प्रतिपादन केले.
या अभिनव सोहळ्याचे संचालन न्यूज प्रवक्ता संजना भांबोरे यांनी केले तर आभार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हा सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी मानले.
0 Response to "प्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करावी - माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे."
एक टिप्पणी भेजें