निवडणूक अधिकाऱ्यांनी खाल्ली माती.....
शनिवार, 13 जून 2026
Comment
• काल अनेक ग्रामपंचायतीसाठी प्रभागांवर करण्याची आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आले.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
वरसे :- त्यात बलाढ्य वरसे ग्रामपंचायतीत आरक्षण सोडत करणारे निवडणूक अधिकारी कमालीचे कन्फुज दिसून आले, हातात निवडणूक आयोग GR नव्हता, नीट प्रभाग लोकसंख्या आराखडा आरक्षित आकडेवारी नव्हती, त्यामुळे कोणाच निवडणूक कार्यक्रम अधिकाऱ्याला उपस्थितांचे समाधान करता आले नाही, प्रभाग वरसे ६ मध्ये अनु जाती, जमाती लोकसंख्या नसताना आरक्षण कसे पडले ? याचे उत्तरही संबंधिताना देता आले नाही,
कोणताच मुद्दा पटवून देता न आल्याने उपस्थितांत अक्षरशः गोंधळ माजला, त्यावर आम्ही हरकती घेऊ असे वरसे ग्रामस्थानी जाहीर करत हा मुद्दा निकाली निघाला, नंतर महिला आरक्षण म्हणत प्रत्येक प्रभागात १ महिला उमेदवार आरक्षण जाहीर झाले, प्रभाग १ मध्ये आधी २ महिला आरक्षण पडले, (प्रभाग २ मध्ये महिला द्या, चिठ्ठी उडवू नका तरीही नियम म्हणत हा खेळ केला) परत चिठ्ठी उडवत पुन्हा १ महिला सर्वसाधारण आरक्षण पडले, असे तीनही जागांवर महिला राज शिक्कामोर्तब झाले. त्याचे रेकॉर्ड झाले. मग हे इप्रित कोणी घडवून आणले हे तहसीलदारांनी लोकांना सांगावे.
असे आरक्षण कार्यक्रम नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकारांसमोर झालेले असताना अचानक प्रभाग १ मध्ये पडद्यामागे उशिरा बदल करत १ सर्वसाधारण आरक्षण करत महिला आरक्षण रद्द केल्याचे समोर आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा माती खाल्ली का ? असा संताप व्यक्त झाला आहे.
निवडणूक कार्यक्रम लोकांसमोर जाहीर होतो, तसे परिपत्रक आहेच, सुरुवातीपासून गोंधळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शेवटही गोंधळ घालून लोकशाहीचा खून केला आहे, जे काही असेल ते लोक मताने जाहीर व्हायला हवे, सर्वसाधारण आरक्षण जाहीर होणे न होणे हे महत्वाचे नाही, पण आरक्षण सोडत कार्यक्रमात जाहीर का केले नाही ? कोणी दबाव टाकला का, कोणी माती खाल्ली याचा खुलासा तहसीलदार किशोर देशमुख यांनी तातडीने करावा, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिक निषेध होणार आहे.
याबाबत निवडणूक अधिकारी गुंड यांना विचारणा केली असता १ महिला आरक्षण चुकून जास्तीचे झाले होते, ते नंतर निदर्शनास आले, त्यामुळे प्रभाग १ मध्ये १ जागा सर्वसाधारण आरक्षण करावे लागले, अशी बतावणी गुंड यांनी केली.
सोडत कार्यक्रम लोकांसमोर होते, तिथेच ही दुरुस्ती का केली नाहीत, कोणाचा दबाव आला, यावर थातूरमातूर उत्तराशिवाय काहीच उत्तर गुंड यांच्याकडे नाही, अधिकारी राजपूत कॉलला प्रतिसाद देत नाहीत, अशात पुन्हा निवडणूक कार्यक्रम घ्यावा, अन्यथा निषेध करू असे अनेकांनी सांगितले आहे.
खरच माती खाल्ली.... निवडणूक अधिकारी सुरुवातीपासूनच चुकत होते, कोणाच्यात एकमत नव्हते, त्यावरून उपस्थितांनी वारंवार धारेवर धरले, त्याच गोंधळात आरक्षण कार्यक्रम पार पडले, असे म्हणताच आता भलतेच कारनामे पडद्यामागे झाले,, या सर्व प्रकरणाचा खुलासा तहसीलदार किशोर देशमुख यांनी करावा अशी मागणी आहे.
नेमके काय झाले, हे लोकांसमोर यायला हवे, नाहीतर हा नागरिकांचा अपमान आहे, निवडणूक प्रक्रियाला गालबोट आहे असे ग्राह्य धरले जाईल..एवढीच अपेक्षा....
0 Response to "निवडणूक अधिकाऱ्यांनी खाल्ली माती....."
एक टिप्पणी भेजें