-->
जादूटोण्याच्या संसारातून तणाव झाला दूर.

जादूटोण्याच्या संसारातून तणाव झाला दूर.

 नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
 
लाखनी :- तालुक्यातील कोलारी (पटाची) लहानू सूर्यवंशी या वृद्ध इसमावर मागील १५ दिवसांपासून जादूटोणा व वैद्युकीचे आरोप झालेला असताना तो खचून नैराश्यात गेला. त्यांनी मुलगा चेतन सूर्यवंशींच्या मार्फत पालांदूर पोलिस स्टेशन व लाखनी अ.भा. अंनिस समितीकडे तक्रार केली. तालुका लाखनी अ.भा. अंनिस समितीने पालांदूर पोलिस स्टेशनकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यामुळे तक्रार अजार्नुसार दोन्ही बाजूचे बयान पोलिस स्टेशनने घेतले. शेवटी गुन्हा न नोंदविण्यापेक्षा गावातील झालेला तणाव दूर करण्यासाठी वैज्ञानिक
कार्यक्रम पोलिस स्टेशन पालांदूर व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (ता. ११)

सभा करण्यात आला.

सभेच्या अगोदर ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही गटाची समजूत समितीने काढली. यावेळी पोलिस स्टेशन पालांदूरचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास मुंडे,

कोलारीचे सरपंच उमेश झंझाड, पोलिस पाटील सुनील लुटे, उपसरपंच लांडगे, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच अ.भा. अंनिस समितीचे जिल्हा सचिव मुलचंद कुकडे, 

जिल्हा सचिव मुलचंद कुकडे व जिल्हा उपाध्यक्ष ग्यानचंद जांभूळकर यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग व मार्गदर्शनातून वैचारिक प्रबोधन केले. अनेक गावकऱ्यांच्या प्रश्नांचे शंका व समाधान केले. त्याचबरोबर कोणी जादूटोणा, भूत, भानामती व करणी असे दावे सिद्ध करून दाखवित असेल त्याला समितीकडून ८० लाख रुपयाचे बक्षीस घोषित केले आहे, अशी माहिती दिली. अशारीतीने अ.भा. अंनिस जिल्हा शाखेच्या पुढाकाराने व पालांदूर पोलिस स्टेशनच्या सहकार्याने मध्यम मार्ग स्वीकारून मागील १५ दिवसापासूनचा सूर्यवंशी कुटुंबीयांवर व गावकऱ्यांवर आलेला तणाव व संघर्ष दूर करण्यात समितीला यश आले. संचालन पोलिस पाटील सुनील लुटे यांनी केले. आभार उपसरपंच झंझाड यांनी मानले. हे गंभीर प्रकरण सुलभ रीतीने हाताळण्यासाठी अ. भा. अंनिस भंडारा जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबुचे , जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

ग्यानचंद जांभूळकर, कार्याध्यक्ष अशोक गायधने, लाखनी तालुका संघटक अशोक वैद्य यांनी प्रमुख

भूमिका बजावून सहकार्य केले व गंभीर वातावरण व तणाव निवळण्यास मदत केली.

0 Response to "जादूटोण्याच्या संसारातून तणाव झाला दूर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article