धावत्या रेल्वेत गळफास लावुन आत्महत्या.
गुरुवार, 18 जून 2026
Comment
• तुमसर रोड रेल्वे स्टेशन वर धक्कादायक प्रकार,ईतवारी ते टाटा नगर ऐक्सप्रेस मधील घटना.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर रोड, 18 जून :- तुमसर रोड रेल्वे स्थानकावर 18 जून गुरुवारी पहाटे सुमारे 3 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ईतवारी-टाटानगर एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर थांबली असता, एका डब्याच्या खिडकीला अज्ञात युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लोंबकळत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहताच रेल्वेतील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक प्रवाशांनी आरडाओरड करत रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. मृतदेह रेल्वेच्या बाहेरील बाजूस लोंबकळत असल्यामुळे संबंधित युवकाचे दोन्ही पाय कापल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दल (RPF) तसेच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. सदर युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून तो अज्ञात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
0 Response to "धावत्या रेल्वेत गळफास लावुन आत्महत्या."
एक टिप्पणी भेजें