रिपाई आठवले गटातील नेते व अनेक कार्यकर्त्यांनी,कामगार नेते घनश्याम चिमणकर यांच्या निवासस्थानी दिली शांत न भेट!..
शनिवार, 20 जून 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
मुंबई :- रिपाई आठवले पक्षाचे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय ज्ञानमित्र घनश्याम चिरणकर सर यांच्या मोठ्या बहिणीचे निधन काल रात्री वयाच्या 80व्या वर्षी झाले आहे, आजशनिवार दिनांक 19/06/2026 रोजी दुपारी त्यांची अंत्ययात्रा झाली आहे भोईवाडा स्मशान भूमीत अग्नी देण्यात आली.त्यांच्या दुःखात संपूर्ण रिपाई आठवले पक्ष सहभागी आहे
तसेच आज दुपारी माननीय ज्ञानमित्र घनश्याम चिरणकर सर यांच्या निवासस्थानी 5E 20 मजलाभोईवाडा मुंबई येथे रिपाई आठवले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री माननीय अविनाशजी महातेकर साहेब यांनी भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले.
या प्रसंगी उपस्थित रिपाई आठवले पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा कामगार नेते माननीय. प्रकाश कमलाकर जाधव साहेब, रिपाई आठवले पक्षाचेमुंबई प्रदेश कोषाधक्ष,ज्येष्ठ नेते माननीय.सुनील मोरे साहेब, सोशल मीडिया आयटी सेल जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी अंकुश नारायण हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते व असंख्य मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे.
0 Response to "रिपाई आठवले गटातील नेते व अनेक कार्यकर्त्यांनी,कामगार नेते घनश्याम चिमणकर यांच्या निवासस्थानी दिली शांत न भेट!.."
एक टिप्पणी भेजें