-->
वरुड येथे श्रीकृष्ण कथा व भव्य महानुभाव पंथीय मेळाव्याचे आयोजन.

वरुड येथे श्रीकृष्ण कथा व भव्य महानुभाव पंथीय मेळाव्याचे आयोजन.



हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- तालुका ग्रामीण महानुभव सेवा मंडळ व श्री चक्रधर मंडळ वरुड चे सौजन्याने परमपूज्य प. म. श्री प्रभाकर दादा कपाटे यांच्या मधुर वाणीतून श्रीकृष्ण कथेचे आयोजन तसेच महानुभाव पंथीय मेळाव्याचे भव्य दीव्य आयोजन ३ ते ७ जून पर्यंत श्री श्रद्धा राधा सेलिब्रेशन हॉल पांढुर्णा रोड वरूड येथे करण्यात आलेले आहे , कार्यक्रमाची सुरवात ३ जून ला सकाळी ८ वा. मोटरसायकल रॅलीने होणार असून

या भक्तिमय सोहळ्याला महानुभाव पंथातील असंख्य विद्वातरत्नांचे मार्गदर्शन व प्रबोधन लाभणार असून प्रमुख आकर्षण सप्तखंजेरीवादक श्री सत्यपाल महाराज सीरसोलीकर यांचे

कीर्तन तसेच सुमधुर आवाजाचे धनी विशाल जोगदेव यांचा भक्तिसंगीत (मेरे चक्रधर मेरे शाम) कार्यक्रम असणार आहे

दि.3 जून ला प. पू. महंत. श्री प्रसन्न मुनी उर्फ नागराज बाबा यांचे हस्ते उद्घाटन तसेच प.पू. म. श्री गोपीराज बाबा शास्त्री प. पू. म. श्री दर्यापूरकर बाबा प.पू.म.श्री न्यायंबास बाबा यांच्या तसेच अमरावती जिल्ह्यातील असंख्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे, ६ जून ला सायं ५वा. वरूड शहरातून महानुभाव ग्रंथाची व विशेषांची भव्य मिरवणूक निघणार असून या सोहळ्याची सांगता दिनांक ७ जून ला सकाळी ९ वा. पंचअवतार पूजनाने होईल

वरील सर्व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प.पू. म. वैरागिबाबा जिल्हा

अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद अमरावती जिल्हा असून या सत्संग आयोजनाचे अध्यक्ष उज्वल डहाके (पिंटू डहाके) आहे कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता आयोजक सर्वश्री सतीश देशमुख, नरेंद्र पवाडे (सभापती

कृषी उत्पन्न बाजार समिती वरूड), प्रकाश डहाके, आशिष कांडल कर, अशोक डहाके, श्याम गावंडे, गोपाल वडनेरकर, उज्वल वानखडे, प्रदीप बहुरुपी, रोशन डहाके, गणेश सातपुते, मनोज खसारे , अनिल राऊत, राजेंद्र काकडे, प्रवीण लुंगे, देवेंद्र शेळके, बाबाराव खाडे तसेच वरूड तालुका ग्रामीण महानुभाव मंडळाचे व चक्रधर मंडळ वरूड चे सदस्य तालुक्यातील सर्व परम सेवक पुरुष व महिला सदभक्त मेहनत घेत आहे तरी या संपूर्ण कार्यक्रमाला आयोजन समितीचे महामंत्री विनय चौधरी, व आयोजन समिती कडून वरूड पंचक्रोशीतीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व जनतेला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आव्हान करीत आहे.

0 Response to "वरुड येथे श्रीकृष्ण कथा व भव्य महानुभाव पंथीय मेळाव्याचे आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article