माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतींना कनेरी/द सर्कलचा अभिवादनाचा मानाचा मुजरा.
सोमवार, 1 जून 2026
Comment
रोशन खोब्रागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृती दिनानिमित्त भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/द (६० गावं) यांच्या वतीने सम्यक बुद्ध विहार समता भूमी गुरढा येथे अभिवादन कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सर्कलमधील बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या श्रद्धेने माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय, संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनकार्याचा गौरव करण्यात आला. समाज परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांचे योगदान अमूल्य असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी जयेंद्र देशपांडे (प्र अध्यक्ष), ॲड. देवेंद्र मेश्राम, कुमुदजी बडोले मॅडम, भुषण ढोके, अविनाशजी मेश्राम, अमरजी तिरपुडे, रक्षक गोंडाणे, विशाल मेश्राम, विनायकजी खोब्रागडे आदींसह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमात बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील ग्रहण करून सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. संपूर्ण परिसरात “जय भीम”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
0 Response to "माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतींना कनेरी/द सर्कलचा अभिवादनाचा मानाचा मुजरा."
एक टिप्पणी भेजें