-->
तुमसर नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीवर न्यायालयाचा दणका..

तुमसर नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीवर न्यायालयाचा दणका..



                  प्रमोद तितीरमारे स्वीकृत सदस्य 

• एकाचे सदस्यत्व कायम दोघांना अपात्र ठरवत फेरनिवडीचे आदेश..
          हर्षवर्धन देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज"

तुमसर :- तुमसर नगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा वादअखेर निकाली निघाला असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नगरपालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या तीन स्वीकृत सदस्यांपैकी एकाचे सदस्यत्व न्यायालयाने कायम ठेवले आहे, तर इतर दोघांची नियुक्ती रद्द करत पुन्हा निवड प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.

नगर परिषद तुमसर येथे स्वीकृत सदस्य म्हणून तीन उमेदवारांची निवड करण्यात आली होती. मात्र, ही निवड प्रक्रिया नियमांनुसार नसल्याचा आरोप

करत हे प्रकरण न्यायालयात गेले होते. गेल्या काही काळापासून हे प्रकरण प्रलंबित होते. दि. २५ जून रोजी न्यायालयाने यावर आपला अंतिम निकाल जाहीर केला. न्यायालयाच्या या निर्णयानुसार प्रमोद तितीरमारे यांचे स्वीकृत सदस्यत्व न्यायालयाने ग्राह्य धरले असून ते कायम ठेवले आहे. शैलेश मेश्राम व हितेश चोपकर या दोन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने हे दोन स्वीकृत सदस्य अपात्र ठरवल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी प्रशासनाला पुन्हा नव्याने निवड प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.

0 Response to "तुमसर नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीवर न्यायालयाचा दणका.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article