-->
दलित' नव्हे आम्ही 'बौद्ध' आहोत...

दलित' नव्हे आम्ही 'बौद्ध' आहोत...


• भाजपची पोटदुखी कशासाठी? माजी आमदार दिलीप बनसोडे यांचे आशु गोंडाणेंना सडेतोड उत्तर.
.         माजी आमदार दिलीप बन्सोड व आशु गोंडाणे 

          दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 भंडारा (जेष्ठ प्र.नि.) :- विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टनि काँग्रेसवर केलेल्या 'दलितविरोधी' आरोपांचा माजी आमदार दिलीप बनसोडे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. "आम्ही दलित नसून बौद्ध आहोत आणि आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आमचा निर्णय हा भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी घेतलेली एक राजकीय रणनीती आहे," अशा शब्दांत बनसोडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसने दिलीप बनसोडे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून दलित समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे

यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला होता. या आरोपांना उत्तर देताना दिलीप बनसोडे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला आमच्या समाजाबद्दल एवढाच पुळका असेल, तर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासंदर्भात ठराव घेतला आणि

'पंचू कमिटी' स्थापन केली, तेव्हा हे भाजपचे लोक गप्प का होते?

संविधान धोक्यात आले तेव्हा भाजप कुठे होती? बनसोडे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना विचारले की, "जेव्हा भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला किंवा ते बदलण्याच्या गप्पा मारल्या गेल्या, तेव्हा हे भाजपचे नेते कुठे लपले होते? आज त्यांना दलित समाजाची आठवण येणे हे केवळ ढोंगी राजकारण आहे."

दबावाचा आरोप फेटाळला "माझ्यावर काँग्रेस पक्षाचा किंवा नाना पटोले यांचा कोणताही दबाव नाही. विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे नसल्यामुळे,

राजकीय वस्तुस्थिती ओळखून हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपला

रोखण्यासाठी आणि भविष्यात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे घेतले आहे," असे स्पष्टीकरण बनसोडे यांनी दिले.

आम्ही 'बौद्ध' आहोत! भाजप वारंवार 'दलित-दलित' असा शब्दप्रयोग करून राजकारण करत असल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. "सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की आम्ही दलित नाही, आम्ही 'बौद्ध' आहोत. आमच्या समाजाच्या भावनांशी खेळण्याचे काम भाजपने थांबवावे. आमचा निर्णय काय असावा, हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

0 Response to "दलित' नव्हे आम्ही 'बौद्ध' आहोत..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article