-->
मा. माजी खासदार सुनिल मेंढे साहेब यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक.

मा. माजी खासदार सुनिल मेंढे साहेब यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक.


संजीव भांबरे 
"साप्ताहिक जानता की आवाज"
 
भंडारा :- तालुक्यातील पलाडी येथे उभारण्यात येत असलेल्या मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारासंदर्भात माजी खासदार सुनिल मेंढे साहेब यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीत टेकेपार, डोडमाझरी, उसरागोंडी तसेच परिसरातील इतर गावांच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः टेकेपार रोडवर मेडिकल कॉलेजचे मुख्य प्रवेशद्वार (गेट) देण्यात यावे, अशी मागणी मार्शल प्रफुल रामटेके यांनी मांडली. तसेच संपूर्ण परिसरातील विकास, नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि स्थानिकांच्या अपेक्षांची माहिती त्यांनी  माजी खासदार सुनिल मेंढे  दिली.

यावेळी पलाडी फाटा या अंडरपास या महत्त्वाच्या विषयावरही सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीस रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष असित बागडे, माजी सरपंच राजकुमार लोणारे, समाजसेवक लक्ष्मण बारापात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक कार्यकर्ते असित बागडे  यांनी ही परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपली भूमिका मांडली. यावेळी  माजी खासदार सुनिल मेंढे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

बैठकीदरम्यान मा. माजी खासदार सुनिल मेंढे यांनी असित बागडे  
मार्शल प्रफुल रामटेके यांना परिसराच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

शेवटी, परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने  माजी खासदार सुनिल मेंढे त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

0 Response to "मा. माजी खासदार सुनिल मेंढे साहेब यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article