-->
खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करा,व्हॉईस ऑफ मीडिया चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करा,व्हॉईस ऑफ मीडिया चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

 • प्रकरण - पत्रकारांबाबद केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचे पत्रकारांचे पालांदूर ठाण्यात निवेदन सादर.

             नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
 भंडारा :- वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांबाबद शिवसेना(शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी अपमानास्पद वक्तव्य करून अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया लाखनी तालुका तर्फे काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. तसेच कारवाई करिता पालांदूर पोलिस स्टेशन ठाणेदार यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवार(ता.२७ जून) रोजी निवेदन पाठविण्यात आले. या प्रकाराने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

             लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळणे ही अत्यंत गंभीर आणि लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारी बाब आहे. पत्रकार हे शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, निर्भयपणे प्रश्न विचारणे आणि जनतेच्या समस्या मांडणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांचा अवमान होणे, हे मुक्त पत्रकारितेच्या वातावरणासाठी अत्यंत घातक आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या विधानाची आपण तात्काळ दखल घ्यावी, पत्रकारांचा सन्मान व त्यांची सुरक्षा अबाधित राहील, यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी,  महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात पत्रकारांना सन्मानाने काम करण्याचे वातावरण मिळावे, ही पत्रकारांची रास्त अपेक्षा आहे.

 अशा मागण्यांचे व्हॉइस ऑफ मीडिया वतीने स्थानिक पोलिस स्टेशन मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनावर व्हॉईस ऑफ मिडिया लाखनी सदस्यगण तुशीत गजभिये मुखरु बागडे, नरेंद्र मेश्राम, हरिश्चंद्र हेडाऊ, मुकेश मेश्राम, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेने राजकीय क्षेत्रात खडबड उडाली असली तरी पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष घालून अशा लोक प्रतिनिधींवर समज देऊन कारवाई करणे आवश्यक झाले आहे, त्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी निवेदन सादर केले आहे.

0 Response to "खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करा,व्हॉईस ऑफ मीडिया चे मुख्यमंत्र्यांना निवेदन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article