-->
नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरण दोषीला फाशीची शिक्षा पुण्यातील विशेष न्यायालयाचा निकाल.

नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरण दोषीला फाशीची शिक्षा पुण्यातील विशेष न्यायालयाचा निकाल.



"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क 

भंडारा :- वृत्तपत्र प्रतिनिधी पुणे जिल्ह्यात नसरापूर गावामध्ये एका साडे तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने ६५ वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळेला दोषी मानत फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी हा निकाल दिला. या प्रकरणाची सुनावणी (२५ जून) रोजी पूर्ण झाली होती. त्यावेळी न्यायालयाने निकाल सुनावताना हा आरोपी दोषी असल्याचं म्हटलं होतं. पुण्यातील विशेष न्यायालयाने निकाल दिला आणि त्यात आरोपीने बलात्कार व हत्या केल्याचे म्हटलं. राज्यात जलदगतीने सुनावणी होऊन लागलेल्या निकालांपैकी हा एक निकाल ठरला आहे.

निकालाचे वाचन करताना न्यायाधीश साळुंके म्हणाले, "शिक्षेच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, शिक्षा कमी करण्यास कारणीभूत परिस्थितींच्या मुद्द्यावर न्यायालयाने विचार केला. अॅड. अजय मिसर यांनी हे प्रकरण मृत्युदंडाची शिक्षा होऊ असा युक्तिवाद केला. यासाठी त्यांनी विविध प्रकरणातील १२ न्याय संदर्भ दिले."

न्यायालयाने या प्रकरणात 'शंकर खाडे' प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेतला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाऐवजी सलग जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

न्यायालयाने म्हटलं, "मृत्युदंडाची शिक्षा देताना कोणते निकष विचारात घ्यावेत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत."

"त्यामध्ये गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप असणे, गुन्ह्यामुळे न्यायालयाच्या विवेकबुद्धीला धक्का बसणे, आरोपी समाजासाठी कायमचा धोका ठरू शकतो, पीडित पूर्णपणे असहाय असणे, गुन्हा कोणत्याही चिथावणीशिवाय करण्यात आलेला असणे असे निकष आहेत. या प्रकरणात होत असल्याचा युक्तिवाद सरकारी शकतेरील सर्व निकष लागू होत पक्षाने केला आहे."

आरोपीच्या बाजूने शिक्षा कमी करण्यास कारणीभूत ठरणारी एखादीही परिस्थिती आढळल्यास 'गुन्हेगाराचा निकष' पूर्ण होत नाही आणि अशा परिस्थितीत आरोपीची मृत्युदंडाची शिक्षा टाळू शकते. त्यानंतरही हे प्रकरण 'दुर्मिळातील दुर्मिळ' प्रकरणांच्या निकषावर तपासणे आवश्यक आहे," असं न्यायालयानं म्हटलं.

न्यायालयाने पुढे म्हटलं, "फिर्यादीच्या वतीने सरकारी पक्षाला सहाय्य करणारे अॅड. विपुल दुशिंग यांनी २

न्यायनिर्णयांचा आधार घेतला. पहिला न्यायनिर्णय 'वसंत दुपारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य' या प्रकरणाचा होता. या प्रकरणात ४७ वर्षीय व्यक्तीने ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती.

दुसरा संदर्भ 'हिम्मतराव सूर्यवंशी' प्रकरणाचा देण्यात आला. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दोषसिद्धी कायम ठेवत मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली होती. पण सुर्यवंशींनी मांडलेले जजमेंट लागू होत नाही. कारण हा आरोपी मुलींसोबत दिसला आणि त्याचे स्पष्टीकरण देऊ शकला नाही.

0 Response to "नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरण दोषीला फाशीची शिक्षा पुण्यातील विशेष न्यायालयाचा निकाल."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article