राजर्षी शाहू महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक कर्तव्य : प्राचार्य राहुल डोंगरे.
शनिवार, 27 जून 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
साप्ताहिक जानता की आवाज"
तुमसर :- दि. २६ : आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि प्रशासनामध्ये सर्व घटकांना समान संधी मिळाली पाहिजे, हा विचार प्रत्यक्ष कृतीतून राबविला. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण, वसतिगृहे, शिष्यवृत्ती आणि विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. आजही देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आणि सामाजिक न्याय या दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून, राजर्षी शाहू महाराजांचे कार्य समाजात प्रत्यक्ष कृतीतून पोहोचविणे हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.
ते स्थानिक शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्रीराम शेंडे यांनी केले, तर नितुवर्षा मुकुरने यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक गडपायले, विद्या मस्के, संजय बावनकर, अशोक खंगार, राहुल रहांगडाले, दीपक बालपांडे, नारायण मोहनकर, प्रीती भोयर, सारिका आथोडे, सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, नेहा बारई आणि झनकेश्वरी सोनावणे यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
0 Response to "राजर्षी शाहू महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक कर्तव्य : प्राचार्य राहुल डोंगरे."
एक टिप्पणी भेजें