उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना जनजागर संघटनेचे निवेदन.
मंगलवार, 2 जून 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जनजागर कला साहित्य बहू. संस्था साकोली च्या वतीने उमेश नंदागवळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा सदस्य सचिव राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन समिती भंडारा यांना कलावंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये सन 2025 26 मधील लाभार्थ्यांची निवडकरण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले. शासनाच्या नियमानुसार ज्या कलावंतांना 50 वर्ष पूर्ण झाली त्यांना शासनाकडून पाच हजार रुपये देण्यात येते. त्याकरिता त्यांना ऑनलाईन फॉर्म भरायला सांगून ते कलावंत आहेत त्यांचा पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून कलेच्या सादरीकरणाचे कागदपत्रे,पेपर कटिंग, फोटो ऑनलाइन करून फार्म पाठवावा लागतो परंतु दहा महिने होऊन सुद्धा त्या कलावंतांची निवड झालेली नाही. त्यामुळे सर्व कलावंत निवड यादीची वाट पाहत आहेत. प्रत्येकाला वाटते की माझी निवड झाली असावी या आशेने सर्व कलावंत वाट बघत आहेत त्यामुळे 2025 26 लाभार्थ्यांची यादी लवकरात लवकर प्रसारित करावी या संदर्भाचे निवेदन देण्यात आले.
तसेच 2021- 22, 22- 23, 23- 24 या वर्षातील ऑफलाइन पद्धतीने कलावंतांची निवड झाली. परंतु अद्याप त्यांना मानधन जमा होण्यासाठी कुठल्याच कागदपत्राची मागणी केली नाही. यासाठी चौकशी करून संबंधित निवड झालेल्या कलावंतांची कागदपत्रे मागवून त्यांच्या खात्यात मानधन जमा करावे हे सुद्धा निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देताना जनजागर संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले, सदस्य लक्ष्मीकांत बोरकर आदी उपस्थित होते.
0 Response to "उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना जनजागर संघटनेचे निवेदन. "
एक टिप्पणी भेजें