-->
आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे..

आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे..


नागपूर/भंडारा :- शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधी नावं ठेवायची नाहीत.. कारण, भाकरी आज शिळी आहे तिनं काल आपलं पोट भरलं होतं.. आणि चप्पल आज तुटली तिने काल आपल्याला आधार दिला होता...!! म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ति ही फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत ही सुख दुःखाची वेळ आल्यावरच कळते. 

आयुष्यातील प्रत्येक समस्या, अडचण ही रेड सिग्नल सारखी असते. थोडा वेळ वाट पाहिली तर तीच हिरवी होत असते. फक्त परीक्षा असते ती संयमाची, धीराची. विचारात गुंतू नका, करा पण वास्तव. कारण विचार असावा पण चिंता नसावी. माणसाला अती चिंता आतून पोखरतात आणि चिंतेचे रूपांतर चितेत होवू शकते. आणि विचारांचा अंधकार हा रात्रीच्या अंधारा पेक्षा भयानक असतो. म्हणून काही विषय सोडून देत चला. अती मनाला न लावता, त्यावर संयमी पणा आणि योग्य मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन मार्गक्रमण करत रहावे.
नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटली असती. स्वतःबरोबर राहण्यातही एक शांत उत्सव दडलेला असतो. जिथे कुणाला सिद्ध करायचं नसतं आणि स्वतः पासून लपायचंही नसतं. निसर्गात अनुकूल आणि प्रतिकूल अशा असंख्य घटना सतत घडत असतात. हे जसे निसर्गात आहे तसेच मानवी जीवनातही. परिणामी बऱ्याच गोष्टी आपल्याला अपरिहार्यपणे स्वीकाराव्या लागतात. त्या स्वीकारतांना अनुकूल भाव-नेने स्वीकारल्यास आनंद मिळतो. प्रतिकूल भावनेने स्वीकारले तर दुःखच वाट्यास येते. बऱ्याच वेळा अनुकूल की प्रतिकूल हे आपल्या मनावर अवलंबून असते.
 अनुकूल घटनांना प्रतिकूल समजून प्रतिक्रिया देणे, म्हणजे नकारात्मक मानसिकता होय.
 
नकारात्मकता म्हणजे मनाची अस्वीकारार्हता, ती का तयार होते. एकांगी विचार, अज्ञान, बुद्धीचा कुर्तक, गोष्टीकडे संशयाने पाहण्याची ब्रुत्ती, ताठरपणा, असहिष्णुता हे सारे असले की नकारात्मक मन तयार होते. आपला सर्वनाश करण्याची वृत्ती नकारात्मक वृतीत आहे. याचा फटका आपल्याला तर बसतोच शिवाय आपल्या सोबत असणाऱ्यांनाही सहन करावा लागतो. सुखाचा आनंद कधीही एकट्याला घेता येत नाही. आपली माणसे त्यात सामावुन घेतली की सुखाचा आनंद दुप्पट होतो. एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येतं असतो कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या एकटेपणातच मीळतात. जेव्हा वेळ तुमच्या बाजूने नसेल तेव्हा संयम तुमचं शस्त्र असावं. जे साध असतं तेच खुप छान असतं. मग ते दिसनं असो, वागणं असो, वा बोलणं...
.                       मंहत गोपालव्यास कपाटे महानुभाव
                                उरळीकांचन पुणे 

1 Response to "आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे.."

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article