-->
उमरेकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती.

उमरेकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती.


• श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली विजय चौडेकर - सामाजिक कार्यकर्ता.

विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज  

नांदेड :- अहिल्याबाई होळकर या भारतीय इतिहासातील आदर्श, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक विकासकामे केली. देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, मंदिरे, घाट, विहिरी व धर्मशाळांची उभारणी करून त्यांनी समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या दूरदृष्टी, प्रशासन कौशल्य आणि जनहिताच्या कार्यामुळे त्यांना "पुण्यश्लोक राजमाता" हा मानाचा किताब प्राप्त झाला.

यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर, उमरेकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचालिका डॉ. सोनिया सचिन उमरेकर तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा आणि लोककल्याणकारी कार्याचा आदर्श समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील.

0 Response to "उमरेकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article