-->
सौंदड येथील सहकारी बँक रामभरोसे; दोन कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर कामकाजाचा डोलारा.

सौंदड येथील सहकारी बँक रामभरोसे; दोन कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर कामकाजाचा डोलारा.


• गाहकांना तासन्तास प्रतीक्षा, रिक्त पदे भरण्याची नागरिकांची मागणी.

"सापताहिक जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी 

गोंदिया :- सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील सहकारी बँक सध्या गंभीर मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करत असून संपूर्ण बँकेचे कामकाज केवळ दोन कर्मचान्यांच्या भरवशावर सुरू असल्यांचे चित्र पाहायला मिळत आहे. परिसरातील शेतकरी, व्यापारी, शासकीय व खासगी कर्मचारी तसेच नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांचे हे प्रमुख केंद्र असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असते. मात्र कर्मचान्यांची संख्या अत्यल्प असल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करा
कामाच्या ताणामुळे कर्मचान्यांवरी अतिरिक्त दबाव निर्माण जाला असून त्याचा परिणाम सेवा वितरणावर होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी मुख्य मुद्दे

1) बँकेत सध्या केवळ व्यवस्थापक आणि कॅशियर अशी दोनच पदे कार्यरत.

2) दररोज शेकडो ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते.

3) कर्ज प्रकरणे, धान खरेदीची रक्कम, वेतन व्यवहारांवर परिणाम.

4) कर्मचान्यांवर कामाचा प्रचंड ताण; मानसिक दबाव वाढला.

5) रिक्त पदे तातडीने भरून अविरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी

सौंदड व परिसरातील नागरिक, शेतकरी आणि व्यापान्यांनी संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रिक्त पदे तातडीमेने भरावी व अतिरिक्त कर्मचान्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास ग्राहकांच्या अडचणी वाढण्याबरोवरच बँकेच्या कामकाजावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 Response to "सौंदड येथील सहकारी बँक रामभरोसे; दोन कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर कामकाजाचा डोलारा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article