-->
भिक्खु एन.बोधिरत्न यांचे दुःखद परिनिर्वाण.

भिक्खु एन.बोधिरत्न यांचे दुःखद परिनिर्वाण.

.
     "साप्ताहिक जनता की आवाज" 
            वृत्तपत्र प्रतिनिधी 

नागपूर :- सम्यक ज्ञानाच्या प्रकाशाने असंख्य लोकांचे जीवन उजळविणारे, प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचा धम्मसंदेश जनमानसापर्यंत पोहोचविणारे आदरणीय भिक्खू एन. बोधिरत्न यांचे आज वाडी, नागपूर येथे दुःखद परिनिर्वाण झाले.

त्यांच्या परिनिर्वाणामुळे बौद्ध समाज, धम्मानुयायी, भिक्खू संघ आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची जी हानी झाली आहे, ती कधीही भरून निघणारी नाही. त्यांनी आपल्या आयुष्यभर तथागत बुद्धांच्या धम्माचा प्रचार-प्रसार करून असंख्य लोकांना सम्यक विचार, नैतिकता आणि मानवतेचा मार्ग दाखविला.
त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेला धम्मसंदेश सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करताना आम्ही त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

"अनिच्चा वत संखारा, उप्पादवयधम्मिनो;
उप्पज्जित्वा निरुज्जन्ति, तेसं उपसमो सुखो."

आदरणीय भिक्खू एन. बोधिरत्न यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली!... 
 जय भीम | नमो बुद्धाय

0 Response to "भिक्खु एन.बोधिरत्न यांचे दुःखद परिनिर्वाण. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article