आदर्श,प्रामाणिक,सत्यप्रिय,जनप्रिय अधिकारी.
बुधवार, 17 जून 2026
Comment
महाराष्ट्राचे FDA आयुक्त मा.श्री तुकाराम मुंढे साहेबांच्या सत्य,प्रामाणिक जनसेवेच्या
कार्यावरील अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी शब्दबद्ध केलेला अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
जनप्रिय आयुक्त
तुकाराम मुंढे
अन्न व औषध । प्रशासन भार ।
भ्रष्टांवर वार । करितसे ॥ १ ॥
तुकाराम मुंढे । हिरा आहे छान ।
गावे गुण-गान। सर्वांनीच ॥ २ ॥
लोकहितासाठी । झटताहे मुंढे ।
जनप्रिय मुंढे । तुकाराम ॥ ३ ॥
महाराष्ट्री आज । तुकाराम नाम ॥
भ्रष्टांना लगाम । लावियली ॥ ४ ॥
दररोज सुरू । सत्याची सफर ।
मुंढेंचा गजर । महाराष्ट्री ॥ ५ ॥
कायद्याचे राज्य । समाजात हवे ।
जन गीत गावे । मुंढेजींचे ॥ ६ ॥
भेसळ सम्राट I गल्लो गल्ली झाले ।
जनांना कळले । उशिराच ॥ ७ ॥
बदलीला मुंढे । नाही घाबरले ।
कधी ना खचले । जीवनात ॥ ८ ॥
कडक शिस्तिचा । सत्य अधिकारी ।
कार्यालयी वारी । दररोज ॥ ९ ॥
अफाट जिद्दीचे । तुकाराम एक ।
कार्य करी नेक । जनांसाठी ॥ १० ॥
प्रामाणिकपणा । रुचलाच नाही ।
पचलाच नाही । तुकाराम ॥ ११ ॥
भ्रष्टाचाऱ्यांची ही । कंबर मोडली ।
तयांना घडली । जेलवारी ॥ १२ ॥
सत्य कार्याला मी । करितो सलाम ।
करांनी प्रणाम । मुंढेजींना ॥ १३ ॥
राज्यस्तरीय संत कबीर
कवीराज पुरस्कार प्राप्त
अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती. ०८७७४८६०९
0 Response to "आदर्श,प्रामाणिक,सत्यप्रिय,जनप्रिय अधिकारी."
एक टिप्पणी भेजें