सर्पदंशाने वृद्धाचा मृत्यू.
शुक्रवार, 12 जून 2026
Comment
प्रविण शेंडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
तिरोडा :- करटी खुर्द येथील अरुण कनोजे (वय ६०) यांचा विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी चारच्या सुमारास करटी शेतात घडली. अरुण कनोजे हे स्वतःच्या शेतात शेतीकामे करण्यासाठी गेले होते. शेतीकामे करत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना गोंदियाला रेफर करण्यात आले. परंतु, वाटेत त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता.११) शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. दुपारी मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Response to "सर्पदंशाने वृद्धाचा मृत्यू."
एक टिप्पणी भेजें