कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू.
शुक्रवार, 12 जून 2026
Comment
• तिरोडा-तुमसर मार्गावरील घटना; दोघेही मलपुरी येथील रहिवासी
प्रविण शेंडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
तिरोडा ता. ११ :- भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १०) रात्री आठच्या सुमारास तिरोडा-तुमसर राज्यमार्गावरील धापेवाडा उपसा सिंचन कार्यालयाजवळ घडली. सौरभ उमेश बघेले (वय २५) व शिवम अंबुले (वय २२, दोघेही रा. मलपुरी) अशी मृतांची नावे आहेत.
तिरोडा-तुमसर राज्य मार्गावरून सौरभ बघेले व शिवम अंबुले हे दुचाकीने प्रवास करीत होते. यावेळी समोरून येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर कारने (एमएच ३५/ ए. जी. २७८५) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सौरभ बघेले याचा
घटनास्थळीच मृत्यू झाला, तर शिवम अंबुले याचा उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेत मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तिरोडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस
घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या अपघातात दुचाकीसह कारच्या पुढील डाव्या बाजूच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
बोरगाव जंगल परिसरात वाहन उलटले
गोंदिया : देवरी-आमगाव मार्गावरील बोरगाव जंगल शिवारातील बेलबोडी परिसरात गुरुवारी (ता. १९) दुपारी दीड वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात चारचाकी वाहन उलटून मोठे नुकसान झाले. सुदैवाने वाहनातील पाचही प्रवासी बचावले. छत्तीसगड राज्यातील धमतरी येथील रहिवासी असलेले काही नागरिक चारचाकी वाहनाने बालाघाट येथून आपल्या गावाकडे परत जात होते. देवरी-आमगाव राष्ट्रीय मार्गावरील बोरगाव जंगल शिवारातील बेलबोडी परिसरात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघात इतका भीषण होता की वाहनाच्या पुढील व बाजूच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वाहनातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःथास सोडला.
0 Response to "कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू."
एक टिप्पणी भेजें