हुतात्म्याचा नातूच सरकारी व्यवस्थेच्या 'बळी'? - भूमी अभिलेख कार्यालयात पदोन्नतीपासून वंचित.
गुरुवार, 4 जून 2026
Comment
• जितेंद्र धुर्वेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी अवघ्या २८ व्या वर्षी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा राजाराम पैकुजी धुर्वे यांच्या नातवावरच स्वतंत्र भारतात प्रशासकीय अन्यायाची कुऱ्हाड कोसळली आहे. भूमी अभिलेख विभागात कार्यरत असलेले हुतात्म्यांचे वारसदार जितेंद्र पांडुरंग धुर्वे यांना सेवा जेष्ठता यादीतून व त्यांच्या हक्काच्या पदोन्नतीपासून (Promotion) हेतुपुरस्सर डावलण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. या अन्यायाविरुद्ध आता त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) कडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठतेच्या अधिकारावर गदा जितेंद्र धुर्वे यांनी पत्रकारांशी बो लताना सांगितले की, शासकीय नोकरीत माझी ह क्काची सेवा ज्येष्ठता (Seniority) राज्य स्तरावर डावलली जात आहे. माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांना बढती देऊन मला जाणीवपूर्वक मागे ठेवण्यात आले आहे. "एका क्रांतीवीराचे रक्त माझ्या धमन्यांत आहे, त्यामुळे मी या अन्यायाविरुद्ध गप्प नाही," असा पवित्रा त्यांनी बसणार आक्रमक घेतला आहे व या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.
प्रशासनाविरुद्ध कायदेशीर आपल्यावरील लढा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धुर्वे यांनी कंबर कसली असून पुढील पावले उचलली आहेतः मॅटची दारे (MAT) ठोठवणारः शासकीय कर्मचाऱ्यांच्या से वा ज्येष्ठतेच्या वादावर न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात याचिका दाखल करणार. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या 'स्वातंत्र्यसैनिक कक्षा 'कडे धाव घेत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना सविस्तर पत्र पाठवून मंत्रालयीन स्तरावरून चौकशीची मागणी केली आहे. माहिती अधिकाराचा (RTI) प्रभावी वापर
ज्येष्ठता यादी माहिती अधिकाराद्वारे मिळवली असून, हेच पुरावे न्यायालयात निर्णायक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भातील 'स्वातंत्र्यसैनिक आणि वारसदार' संघटनेच्या माध्यमातून हा विषय राज्यपालांपर्यंत नेण्याचाही त्यांचा मानस आहे. प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती
वारसदाराला हुतात्म्याच्या न्याय देण्याऐवजी भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकारी माझ्या हक्कावर गदा आणत आहेत. स्वातंत्र्यसैनिकाच्या नातवाला शासकीय नोकरीत का डावलले? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल, असे म्हणत त्यांनी आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वातंत्र्यवीराच्या कुटुंबावर सर कारी दरबारी होत असलेला हा अन्याय आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून, शासन यावर काय भूमिका घेते, या कडे सर्वांचे लक्ष लागले
कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पुढे कसे केले गेले, याची 'ऑ फिस नोटिंग' आणि आहे.
0 Response to "हुतात्म्याचा नातूच सरकारी व्यवस्थेच्या 'बळी'? - भूमी अभिलेख कार्यालयात पदोन्नतीपासून वंचित."
एक टिप्पणी भेजें