बंसोड व अग्रवालांच्या माघारीने बदलले निवडणुकीचे समीकरण.
गुरुवार, 4 जून 2026
Comment
• नरेश ईश्वरकर यांना काँग्रेसचा पाठिंबा; ब्राह्मणकरांविरुद्ध थेट लढतीची चिन्हे.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
भंडारा :- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली. प्रफुल अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे समीकरण बदलले. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेश ईश्वरकर यांनाच काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
रिंगणात केवळ तीन उमेदवार
२) नरेश माणिक ईश्वरकर (काँग्रेस समर्थित अपक्ष)
३) सचिन यशवंत कुंभलकर (अपक्ष)
माना पटोलेंची घोषणा काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा नरेश ईश्वरकर यांनाच काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा असल्याचे जाहीर झाले.
काँग्रेस समर्थित उमेदवार अग्रवालांच्या माघारीने संभ्रम.
काँग्रेस समर्थित उमेदवार म्हणून प्रफुल अग्रवाल यांचे नाव पुढे आले होते. अंतिम क्षणी त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. चर्चाना पूर्णविराम देत नाना पटोले यांनी नरेश ईश्वरकर यांना काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला.
ईश्वरकर यांना नवे बळ.
भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचा मुद्रा पुढे रेटत आहेत. आता काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या उमेदवारीला नवे बळ मिळाल्याचे मत राजकीय जानकारांचे.
भाजपच्या पाठीशी महायुती.
भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या पाठीशी महायुतीची संपूर्ण ताकद. प्रफुल पटेल, डॉ. पेरिणय फुके, विजय रहांगडाले, राजू कारेमोरे, संजय पुराम, सुनील मेंढे, सुनील फुंडे, राजेंद्र जैन यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित.
मतदान :- 18 जून 2026
मतमोजणी :- 22 जून 2026
त्रिकोणी लढत
मतदान 18 जून रोजी होणार असून मतमोजणी 22 जून रोजी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत नवे समीकरण निर्माण झाले असून, उर्वरित दिवसांत दोन्ही प्रमुख गटांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार हालचाली होण्याची शक्यता.
मतदान : 18 जून 2026
मतमोजणी : 22 जून 2026
0 Response to "बंसोड व अग्रवालांच्या माघारीने बदलले निवडणुकीचे समीकरण."
एक टिप्पणी भेजें