-->
अमरावती येथील साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले,यांना पुणे येथे होणाऱ्या कवीसंमेलनाचे निमंत्रण.

अमरावती येथील साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले,यांना पुणे येथे होणाऱ्या कवीसंमेलनाचे निमंत्रण.



"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क 

अमरावती :- साहित्य सम्राट,पुणे द्वारा आयोजित जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त " राज्यस्तरीय व्दिशतकोत्तर रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन - २०२६" शुक्रवार दि.५ जून २०२६ रोजी स्व.विठ्ठलराव तुपे नाट्यगृह,माळवाडी, हडपसर, पुणे येथे संपन्न होत आहे.

  या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष विवेकवादी विचारवंत मा.प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस,उद्घाटक चित्रपट निर्माते मा.दत्ता दळवी स्वागताध्यक्ष मा.विनोद अष्टुळ संस्थापक अध्यक्ष,साहित्य सम्राट,पुणे,कवीसंमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ गझलकार मा.म. भा.चव्हाण,विशेष अतिथी मा.प्रदीप निफाडकर महाराष्ट्र साहित्य परिषद असून या साहित्य संमेलनातील निमंत्रित कवींच्या कवीसंमेलनामध्ये अमरावती येथील अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
            प्रा.अरुण बुंदेले यांचे 'निखारा' आणि 'अभंग तरंग' या दोन काव्यसंग्रहासह सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक विषयावरील अकरा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपद,प्रमुख अतिथीपद भूषविली आहेत.
       पुणे येथे होणार्‍या या राज्यस्तरीय द्विशतकोत्तर रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे निमंत्रण मिळाल्याबद्दल अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0 Response to "अमरावती येथील साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले,यांना पुणे येथे होणाऱ्या कवीसंमेलनाचे निमंत्रण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article