जागतिक महासागर दिन....
शनिवार, 6 जून 2026
Comment
संपूर्ण जगात "जागतिक महासागर दिन" दि.८ जून रोजी साजरा केला जातो.महासागर दिनाचा मुख्य उद्देश मानवी जीवनात महासागरांचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करणे हा आहे.पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के भाग महासागरांनी व्यापलेला असून, पृथ्वीवरील पाण्याचा तो मुख्य स्त्रोत आहे.महासागरांना पृथ्वीचे 'फुफ्फुस' म्हटले जाते, कारण आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनपैकी ५० टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन महासागरांमधून मिळतो.
वातावरणामधील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमान संतुलित ठेवण्यात महासागर मोठी भूमिका बजावतात. महासागरांमुळेच पृथ्वीवरील जलचक्र (Water Cycle) नियमित चालते, ज्यामुळे आपल्याला पाऊस मिळतो. अनेक देशांची अर्थव्यवस्था, पर्यटन आणि लाखो मच्छिमारांचे उपजीविकेचे साधन हे सर्वच पूर्णपणे समुद्रावर अवलंबून आहे.
महासागर हे जगातील अब्जावधी जीव, वनस्पती आणि जलचरांचे नैसर्गिक निवासस्थान आहे.मानवाला लागणारे अन्न, विशेषतः प्रथिनांचा (Protein) एक मोठा वाटा सागरी जीवसृष्टीतून मिळत असतो,म्हणून महासागराला प्रदूषणापासून वाचवणे काळाची गरज आहे .
समुद्रात दरवर्षी कोट्यवधी टन प्लास्टिक कचरा टाकला जातो, ज्यामुळे सागरी प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे.
प्लॉस्टिक प्रदूषणामुळे दरवर्षी लाखो मासे, कासव आणि समुद्री पक्षी आपला जीव गमावतात.कारखान्यांचे रसायनेयुक्त सांडपाणी आणि जहाजांमधून होणारी तेलगळती यामुळे समुद्राचे पाणी विषारी बनत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे (Global Warming) समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत असून, हिमनद्या वितळत आहेत. पाण्याच्या वाढत्या तापमानामुळे समुद्रातील दुर्मिळ प्रवाळ कट्टे (Coral Reefs) नष्ट होत चालले आहेत.समुद्रातील माशांची अनिर्बंध आणि बेकायदेशीर मासेमारी होतो असल्यामुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महासागरामधील वाढते प्रदूषण अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्यासाठी आणि अन्न साखळीसाठी अत्यंत घातक ठरताना दिसत आहे.जर समुद्राचे आरोग्य बिघडले, तर संपूर्ण पृथ्वीवरील हवामान चक्र विस्कळीत होईल, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) या समस्येचे गांभीर्य ओळखून २००८ मध्ये या दिनाला अधिकृत मान्यता दिली. महासागर वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून कापडी पिशव्यांचा वापर करणे आवश्यक आहे. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता फार महत्वाची आहे.पर्यटनाच्या वेळी तिथे कचरा न टाकता तिथे असलेला कचरा स्वच्छ करणे ही जबाबदारी पर्यटकांनी स्वीकारणे आवश्यक आहे. अनेक कारखान्याद्वारे औद्योगिक कचरा आणि घाण सांडपाणी थेट समुद्रात सोडल्या जाते त्यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवाला तर धोका आहेच शिवाय मानवालाही धोका आहेच.सागरी जीवांच्या संरक्षणासाठी झटले पाहिजे . सागरी अभयारण्यांची निर्मिती केजी पाहिजे.
शाळा आणि महाविद्यालयांमधून विद्यार्थी -विद्यार्थिनींना सागरी परिसंस्थेबद्दल मार्गदर्शन करून जागृत करणे महत्त्वाचे आहे.
महासागर हे केवळ पाण्याचे साठे नाहीत तर ते पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्राण आहेत.
"समुद्र वाचेल, तरच पृथ्वीवरील सजीव सृष्टी सुरक्षित राहील" हा संदेश जनसामान्यंमध्ये विविध कार्यक्रम घेऊन पोहोचविला पाहिजे म्हणजे महासागराविषयी जागृती निर्माण होईल.या महासागर दिनी सर्वांनी समुद्र स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प करूनतो पूर्ण केला पाहिजे. निसर्गाचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढीसाठी सुरक्षित ठेवणे, प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे.ही जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे .
समता गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.८०८७७४८६०९
0 Response to "जागतिक महासागर दिन...."
एक टिप्पणी भेजें