-->
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दि.६ जून २०२६ ला असलेल्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रा.अरुण बुंदेले लिखित 'निखारा' काव्यसंग्रहातील वंदनगीत वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दि.६ जून २०२६ ला असलेल्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रा.अरुण बुंदेले लिखित 'निखारा' काव्यसंग्रहातील वंदनगीत वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.



             वंदनगीत
छत्रपती शिवाजी महाराज

वंदन छत्रपती राजे शिवबांना ।
हिंदवी सु-स्वराज्य संस्थापकांना ।।धृ.।।

जनकल्याणकारी शिवबा राजे ।।
द्रष्टे जाणते शिव छत्रपती राजे ।। 
बहुजनांचे प्रतिपालक राजे ।।
तव सतकर्माची करू अर्चना ।।१।।

वर्ण-जातीभेद, पंथ-धर्म भेद ।।
सु-स्वराज्यात ना कोणताच भेद ।। 
गनिमांवर सदाच लक्ष्यभेद ।।
राजेंच्या कार्याची करू आराधना ||२||

परस्त्रीचा मातेसम अत्यादर ।।
स्त्रीयांवर ना कधीच अत्याचार ।। 
शिवराय स्वराज्य माहेरघर ।।
स्मरण करू शिवबांच्या स्मृतींना ।।३।।


 संत कबीर कवीराज पुरस्कार प्राप्त
              कवी
    प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
   अमरावती :८०८७७४८६०९

0 Response to "छत्रपती शिवाजी महाराजांच्या दि.६ जून २०२६ ला असलेल्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रा.अरुण बुंदेले लिखित 'निखारा' काव्यसंग्रहातील वंदनगीत वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article