रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ता संमेलन.
बुधवार, 17 जून 2026
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
साप्ताहिक जनता की आवाज"
मुंबई :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आज सिल्वासा येथे दिव, दमण, दादरा नगर हवेली, गुजरात आणि महाराष्ट्र ( मुंबई, ठाणे आणि कोकण ) या ठिकाणच्या कार्यकर्ते यांचे कार्यकर्ता संमेलन निसर्गरम्य आणि ऐतिहासिक केंद्रशासित प्रदेशात सिल्वासा येथील फोर स्टोन रिसॉर्ट येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, रिपब्लिकन पक्षाची बांधणी आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खुल्या पत्राच्या आधारावर जनतेस दिलेला पुरोगामी आणि सर्वसमावेशक व्यापक विचार रिपब्लिकन पक्ष म्हणून राबवणे आवश्यक आहे याबाबतीत ज्येष्ठ विचारवंत मंदार भारदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सहकार आघाडी उभी करून सहकाराचे विविध उपक्रम कार्यकर्त्यांनी करण्यासाठी संदर्भात सहकार आघाडीचे प्रमुख सलीम सय्यद यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजक विनोद जेठवा प्रदेशाध्यक्ष दादरा नगर हवेली प्रदेशाध्यक्ष आणि दीप सहा कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख आयोजनामध्ये पार पडला. सदर कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे नेते अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, एम एस नंदा, सीमाताई आठवले गौतम सोनवणे,दयाल बहादुरे, कांतीकुमार जैन सुरेश बारशिंग, पप्पू कागदे अशोक भट्टी, आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे अभयाताई सोनावणे, उषा ताई रामलू संगीताताई आठवले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ता संमेलन."
एक टिप्पणी भेजें