-->
पिग्मी एजंटांच्या कमिशन कपातीविरोधात तुमसरमध्ये रणशिंग.

पिग्मी एजंटांच्या कमिशन कपातीविरोधात तुमसरमध्ये रणशिंग.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज".

तुमसर :- सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी दैनिक बचत प्रतिनिधी (पिग्मी एजंट) यांचे कमिशन २.५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करणाऱ्या परिपत्रकाविरोधात दि. ५ जून रोजी तुमसर येथे शेकडो महिला व पुरुष अभिकर्त्यांनी एकत्र येत एकदिवसीय धरणे आंदोलन व 'काम बंद' आंदोलन केले. या आंदोलनामुळे सहकारी पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला असून कोट्यवधी रुपयांच्या ठेव संकलनावर परिणाम झाल्याची चर्चा सहकार क्षेत्रात रंगली आहे.

महाराष्ट्र राज्य पतसंस्था अभिकर्ता संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल कारेमोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयासमोर

सकाळपासूनच अभिकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. विविध पतसंस्थांचे अभिकर्ते, यांनी एकत्र येऊन शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी सहाय्यक निबंधक यांच्यामार्फत सहकार आयुक्त व निबंधक तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांना निवेदन सादर केले.

यावेळी आंदोलनस्थळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. लोकप्रतिनिधींनी अभिकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

आंदोलकांच्या मते, वाढती महागाई, इंधन

दरवाढ, प्रवास खर्च आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे पिग्मी एजंटांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत कमिशन २.५ टक्क्यांवर आणणे म्हणजे हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा आणणारा निर्णय असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे कमिशन किमान ४ टक्के करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच सुधारित उपविधींनुसार पिग्मी एजंटांकडून कर्ज वितरण, कर्ज वसुली व इतर अतिरिक्त कामे करून घेत असताना त्यासाठी कोणत्याही स्वतंत्र मोबदल्याची तरतूद नसल्यानेही संताप व्यक्त करण्यात आला. याशिवाय, पतसंस्थांना कमिशन निश्चित करण्याची पूर्वीची स्वायत्तता पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणीही

करण्यात आली. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सहाय्यक निबंधक प्रमोद हुमणे यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासन व वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच राज्यस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलनाची सांगता केली. सदर आंदोलनात तालुक्यातील शेकडो अभिकर्ता उपस्थित होते. आंदोलनालाआ. राजुकारेमोरे, माजीआ. चरण वाघमारे, नगराध्यक्ष सागर गभने, माजी नगराध्यक्ष प्रदिप पडोळे आदींनी भेट दिली.

0 Response to "पिग्मी एजंटांच्या कमिशन कपातीविरोधात तुमसरमध्ये रणशिंग."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article