-->
उपवर्गीकरण बदर समिती रद्द करा रिपाई आठवले गटाची मागणी.

उपवर्गीकरण बदर समिती रद्द करा रिपाई आठवले गटाची मागणी.

.        निवेदन देतांना जाधव साहेब रिपाई कार्यकर्ते 

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

बुलडाणा :- उपवर्गीकरण बदर समिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी रिपाई आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी एका निवेदनाद्वारे आमदार संजय गायकवाड यांच्या कडे केली आहे. अनुसूचित जाती अबकड उपवर्गीकरण व बदर समिती जी नेमली आहे. जी अनुसूचित जाती (एसी) प्रवर्गा मधे जो एकसंध सलोखा होता तो तसाच राहिला पाहिजे व तो गुण्यागोविंदाने हा प्रवर्ग राहावा यासाठी बदर समीती जी अनुसूचित जाती अबकड उपवर्गासाठी नेमली आहे. ती असविधानीक आहे ती जाती जातीत तेढ निर्माण करणारी आहे. त्या मुळे ती रद्द

करण्यासाठी आपण येत्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करावा व तो का रद्द करावा हे विधीमंडळाच्या निदर्शनास आणून द्यावे. अशी मागणी केली. त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी मी हा प्रश्न येत्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून तो रद्द कसा करता येईल याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन रिपाई शिष्टमंडळास दिले. यावेळी प्रा. भैयासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, आशाताई वानखेडे जिल्हाध्यक्षा वंदना वाघ, मुरलीधर गवई, महीला रामभाऊ शिंदे, इंजि. शरद खरात, राजेश सरकटे, प्रकाश पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Response to "उपवर्गीकरण बदर समिती रद्द करा रिपाई आठवले गटाची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article