-->
धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या : जंतर-मंतरवर.कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार !..

धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या : जंतर-मंतरवर.कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार !..

• देशभरातील हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क 

दिल्ली/नागपूर :- नीट परीक्षा पेपरफुटी आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील घोटाळा प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (दि. ६) दिल्लीतील जंतर-मंतरवर 'कॉकरोच जनता पार्टीच्या' निदर्शनास प्रारंभ झाला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र
प्रधान राजीनामा द्या! अशा घोषणांनी आज जंतर-मंतरचा परिसर दणाणून गेला.

निदर्शनात हजारो आंदोलक सहभागी झाले. या आंदोलनात देशभरातून आलेले हजारो आंदोलक सहभागी झाले होते. वामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि तरुणांची संख्या मोठी होती. आपल्या मुलांच्या

भविष्यासाठी आणि वा गैरप्रकाराच्या विरोधात न्याय मागण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकही आपल्या पाल्यांसह या आंदोलनात खांद्याला खांदा लावून उमे आहेत.

या आंदोलनाची हाक 'कॉकरोच जनता पार्टीचे' संस्थापक अभिजीत दिपके यांनी
हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अन् 'जय भीम'चा नारा देत अभिजीत दिपके दिल्लीत दाखल

नीट पेपर लीक प्रकरणा विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (उगा) या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके शनिवारी सकाळी अमेरिकेतील बोस्टनहुन दिल्लीत दाखल झाले. दिल्ली विमानतळावर उतरताच त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला आणि त्यांनी 'जय भीम'चा नारा दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या प्रत्रांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक विद्याव्यांचे भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स वर पोस्ट करत आपल्या समर्थकांना जंतर-मंतर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. पुस्तक आणि तिरंगा घेऊन या. पोलिसांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून फुले द्या. हे आंदोलन प्रेम, शांतता आणि संविधानिक मागनि पुढे नेऊया, असे आवाहन त्यांनी केले होते. दरम्यान, जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. बापूचों या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला.
तरुणांच्या संतापामुळे शेअर बाजार आणि भारतीय अर्थव्यवस्था हादरणार?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, एखाद्या देशातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होणे ही केवळ सामाजिक समस्या नसून आर्थिकदृष्ट्याही गंभीर बाब असते. कारण युक्क हेच भविष्यातील ग्राहक, कर्मचारी, उद्योजक आणि करदाते असतात. जर मोठ्या प्रमाणावर युवक रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या मागण्यांना व्यापक पाठिंबा मिळाला, तर सरकारवर धोरणात्मक बदलांचा दबाव वाडू शकतो. त्यामुळे रोजगार, शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित क्षेत्रांमध्ये नवीन निर्णय घेतले जाऊ शकतात. जागतिक गुंतवणूकदार एखाद्या देशात गुंतवणूक करताना त्या देशातील सामाजिक स्थिरता आणि भविष्यातील आर्थिक क्षमता यांचा विचार करतात. युवकांमधील वाढता असंतोष आणि बेरोजगारीची भावना ही गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. विश्लेषकांच्या मते, जर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर वाढले आणि दीर्घकाळ चालले, तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. यापूर्वी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनानंतर केंद्र सरकारला कायदे मागे घ्यावे लागले होते. त्यामुळे सीजेपी च्या आंदोलनाकडेही गंभीरतेने पाहिले जात आहे.

दिली होती. ते आज सकाळीच अमेरिकेहन दिल्लीत परतले. ते विमानतळावरून थेट जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. परीक्षांमधील या गोंधळामुळे विद्याध्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, केंद्र सरकारने आणि शिक्षणमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. देशातील

राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी देतील. झुरळेही घाबरत नाहीत आणि ती कधी मरतही नाहीत, असे अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतर येथील आंदोलकांना संबोधित करताना म्हटले. आंदोलनात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण व्यावसायिक आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या

यांनी समर्थकांना हे आंदोलन पूर्णपणे

शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आदराचे प्रतीक म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना फुले देण्याचेही सुचवले. सामाजिक कार्यकर्ते सोनम बांगचुक यांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला असून, अभिजीत दीपके यांना अटक झाल्यास आपण सहा आठवड्यांचे उपोषण करू, असे त्यांनी जाहीर केले.

0 Response to "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या : जंतर-मंतरवर.कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article