कर्माचा सिद्धांत म्हणजेच कर्मा रिटर्न्स हे नक्की आहे !
शनिवार, 6 जून 2026
Comment
• कोणाची ही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परीणाम भोगावे लागतात....
काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, जसे की शारिरीक, मानसिक, आर्थिक,..... अपमानास्पद वागणुक,.... कोणांचे मन दुखावले असू शकते..... कोणावर अन्याय केला गेलेला असतो, कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते......छळ केलेला असेल, शारिरीक दुखापत केलेली असेल, किंवा प्रेमात गैरफायदा त्रासाचे घेतला गेलेला असेल, कुठलेही कारण असो... वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो.
तो खुप दुखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकते, जाणुन-बुजून त्रास देर्णाय़ा व्यक्तीला हे समजत नसेल,पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो.त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते, मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते.
त्यालाच तळतळाट असं म्हटले जाते.....
मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, किंवा कुठल्याही नकारात्मक परिणाम जाणवणाऱ्या काही ही घटना घडू शकतात.... आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आह-ोत हे जगात फक्त दोनच व्यक्तिंना माहीत असते, एक दुसरा परमात्मासमोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परत फेड याच जन्मात करावी लागते.
तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा अगर नका ठेवू तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असू दे, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो. मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले, तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणते ही महान पातक केलेलं नाही, की ज्याच्या परीणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुखः सोसणे माझ्या नशिबी यावे? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व
जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली, धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टिद्वारे पाहीले की जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षाची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली, धृतराष्ट्र राजाची त्या वेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले, कर्म हे फल देऊनच शांत होते.
प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ पुढे मागे होऊ शकतो, हाच कर्माचा सिद्धांत आहे, कारण कर्म हे बुमरँग सारखे स्वतःवरच येत असते. हेतू चांगला असेल तर चांगले अन वाईट असले तर वाईट परत मिळणारच !.. आपणच ठरवायचे की आपले कर्म कसे असावे
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर।। हाच आहे कर्माचा सिद्धांत!..
उरळी कांचन पुणे
0 Response to "कर्माचा सिद्धांत म्हणजेच कर्मा रिटर्न्स हे नक्की आहे !"
एक टिप्पणी भेजें