शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रभावी चर्चा.
गुरुवार, 25 जून 2026
Comment
कुलदीप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- नामदेव काशिद तालुका कृषि अधिकारी, भंडारा
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तालुका भंडारा अंतर्गत दिनांक २५ जून २०२६ ला
तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समिती सभा उत्साहात तालुका कृषि अधिकारी कार्यालय , भंडारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सभेमध्ये सर्वप्रथम तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतिश वैरागडे यांनी निवड झालेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचे शब्द सुमनांनी स्वागत करून सभेला सुरुवात केली.
सभेमध्ये खरीप हंगाम २०२६-२७ च्या अनुषंगाने विविध कृषी विषयांवर अरुण हारोडे मंडळ कृषि अधिकारी, भंडारा यांनी कृषि विभागाअंतर्गत फळबाग, लागवड योजना, महाविस्तार Ai अँप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि महाडीबीटी योजना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदर सभेचे आयोजन तालुका कृषि अधिकारी, भंडारा नामदेव काशिद यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये करून सदर सभेत सर्व सदस्यांच्या बहुमताने *प्रकाश मस्के,डव्वा कृषि भूषण शेतकरी यांची बिनविरोध तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.*
सभेला कल्पना कुर्झेकर सभापती पंचायत समिती, भंडारा, यशवंत सोनकुसरे जि. प.सदस्य, भंडारा, विनोद बांते जि. प.सदस्य, भंडारा, प्रेमदास वणवे जि. प. सदस्य, भंडारा आणि तानाजी गायधने, देवानंद चौधरी कृषी भूषण शेतकरी, प्रकाशजी मस्के कृषि भूषण शेतकरी, डॉ. संजय एकापुरे संचालक शेतकरी गणेशपूर शेतकरी उत्पादक कं., भंडारा प्रभुजी हटवार, कृषी तज्ञ सुधीर मधुकर धकाते, वंदना वैद्य , गुड्डू हातझाडे आणि
*विशेषता यामिनी सुरेश बांडेबूचे प्रगतिशील महिला शेतकरी यांनी कृषी विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय शेतकरी अभ्यास दौऱ्या दरम्यान फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, येथील शेतीपद्धती बद्दल उपस्थित सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.*
सभेमध्ये खरीप हंगामातील पिक नियोजन, दर्जेदार बियाणे व खतांची उपलब्धता, पीक संरक्षण, कीड व रोग व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, पीक विमा योजना, मृदा आरोग्य व्यवस्थापन तसेच सल्लागार समिती सदस्यांनी शेतकऱ्यांसमोरील विविध समस्या व सूचना मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
सभेच्या शेवटी शेतकरी हिताच्या दृष्टीने विभाग व शेतकरी यांच्यात समन्वय वाढवून कृषी विकासाला चालना देण्याचे आवाहन करण्यात आले.
उपस्थितांनी सभेतील चर्चेचे स्वागत करून कृषी विभागाच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सतिश वैरागडे यांनी सर्व उपस्थित अध्यक्षांचे आणि सदस्यांच्या परवानगीने आभार मानून सभेची सांगता केली.
0 Response to "शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रभावी चर्चा."
एक टिप्पणी भेजें