छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.२६ जून २०२६ ला असलेल्या १५२ व्या जयंती निमित्त सर्वांना अभिनंदन..
गुरुवार, 25 जून 2026
Comment
छत्रपती शाहू महाराज
छत्रपती शाहू । राजाच्या रूपात ।
जन्मले ग्रामात । कागलात ।।१।।
शाहुंचे संस्थान । एक कोल्हापूर ।
कार्य सर्वदूर । भारतात ।।२।।
पेटवून दिली । प्रकाशाची वात ।
तिमिराची रात । संपविली ।।३।।
बोले तैसा चाले । कर्ते सुधारक ।
प्रजेचे नायक । कर्मांनीच ।।४।।
छत्रपती शाहू । आरक्षण दाते ।
पहिलेच नेते । भारतात ।।५।।
कोल्हापूर क्षेत्री । मुक्त केले जन ।
अस्पृश्यतेतून । शाहू राजे ।।६।।
राजे बहुजन । सर्वांना शिक्षण ।
बोर्डिंग स्थापन । संस्थानात ।।७।।
शाहुंच्या कार्याला । करितो नमन ।
करांनी वंदन । कोटी कोटी ।।८।।
राज्यस्तरीय संत कबीर
कवीराज पुरस्कार प्राप्त
अभंगकार
अमरावती : ८०८७७४८६०९
0 Response to "छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.२६ जून २०२६ ला असलेल्या १५२ व्या जयंती निमित्त सर्वांना अभिनंदन.."
एक टिप्पणी भेजें