बडनेरातील समता चौक झाले जलमय.
मंगलवार, 23 जून 2026
Comment
येत्या सात दिवसात कार्यवाही करा अन्यथा आंदोलन अटळ.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
बडनेरा :- येथील समता चौक स्थित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारका मागील लगतचा मुख्य रस्ता उखडल्याने या भागात खड्डे निर्माण झालेत. पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. नागरिकांना तसेच स्मारकाला भेट देणाऱ्या अनुयायांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुतळा स्मारक समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन व वृत्तपत्रामध्ये बातम्या व समाज माध्यमातून येथील परिस्थितीचे चित्रफित प्रसिद्ध करून सुद्धा अद्याप पर्यंत या रस्त्याचे काम करण्यात आले नाही.समता चौकातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाच्या मागील बाजूने जाणारा रस्ता वर्षभरापासून उखडला आहे. काही महिन्याभरापूर्वी थातुरमातुर दुरुस्तीचे काम करण्यात होते. मात्र पाणी साचण्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी स्मारकाच्या आत शिरण्याचा धोका आहे. मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी साचत असल्याने वाहतूकदारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. उखडलेला रस्ता तातडीने मजबूत करण्याबरोबरच पोलिस स्टेशनच्या भिंतीपासून नालीचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती पुतळा स्मारक समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी येत्या सात दिवसा मध्ये संबंधित विभागाकडून कार्यवाही न झाल्यास साचलेल्या पाण्यात बसून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्मारक समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी प्रशासनास दिला आहे. यावेळी पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये, उपाध्यक्ष अशोक नंदागवळी, कोषाध्यक्ष मधुकर साखरे,सदस्य पप्पू गडलिंग, मछिंद्र भटकर यांनी प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेऊन कार्यवाही करण्याची विनंती केली आहे..
_____अविनाश गोंडाणे अमरावती 9923264193
0 Response to "बडनेरातील समता चौक झाले जलमय."
एक टिप्पणी भेजें