-->
समतेचा आणि भक्तीचा वारसा जपणाऱ्या रुख्मिणी मातेच्या पालखीचे अंबानगरीत जल्लोषात स्वागत.

समतेचा आणि भक्तीचा वारसा जपणाऱ्या रुख्मिणी मातेच्या पालखीचे अंबानगरीत जल्लोषात स्वागत.


• माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते स्वागत.

         अविनाश गोंडाणे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

अमरावती :- श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे आषाढी एकादशी सोहळ्यासाठी प्रस्थान करणाऱ्या माता रुख्मिणीच्या पवित्र पालखीचे अंबानगरीतील बियाणी चौकात माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर तसेच खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. सर्वधर्मीय नागरिक, वारकरी, भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा स्वागत सोहळा सामाजिक एकात्मतेचा आणि समतेचा संदेश देणारा ठरला.

श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या रुख्मिणी मातेच्या पालखीची यंदाची ४३२ वी परंपरागत वारी भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. अनेक शतकांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक मानली जाते.

रुख्मिणी मातेच्या पालखीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मानाचे स्थान प्राप्त व्हावे तसेच शासकीय पूजनाचा सन्मान मिळावा यासाठी माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून आज रुख्मिणी मातेच्या पालखीला पंढरपूर येथे मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे अमरावती शहरात पालखी आगमनानंतर बियाणी चौकात स्वागत करण्याची परंपराही त्यांनीच सुरू केली असून ती आजही अविरतपणे सुरू आहे.

बियाणी चौकात भक्तीरसाला उधाण

सायंकाळी पालखीचे बियाणी चौकात आगमन होताच टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “जय जय रुख्मिणी माते” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकऱ्यांच्या मुखी विठ्ठलनाम आणि वातावरणात भक्तीचा दरवळ असा मंगलमय सोहळा अनुभवण्यास मिळाला.

माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांचा वारकऱ्यांसोबत भक्तिभावाचा सहभाग.

पालखी स्वागत सोहळ्यानंतर माजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत भक्तिरसात सहभागी होत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेत वारकरी परंपरेप्रती असलेली आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली.

सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविणारा सोहळा.

तिवसा विधानसभा मतदारसंघातील तसेच अमरावती शहर व ग्रामीण भागातील विविध समाजघटकांचे नागरिक, वारकरी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व धर्म, पंथ आणि समाजातील नागरिकांच्या सहभागामुळे हा सोहळा सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा ठरला.

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या स्वागत सोहळ्याला खासदार बळवंत वानखडे, अमरावती काँग्रेस जिल्हाध्यक्ष बब्लूभाऊ देशमुख , माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, शहर पोलीस आयुक्त राकेश ओला, निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, अमरावती पोलिस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, अमरावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष मोरे, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, अनिल अग्रवाल, सुरेश रतावा, संजय शिरभाते, जयंतराव देशमुख, अभय देशमुख, श्याम बेलसरे, श्रीकांत बोंडे, गजानन देशमुख, मुकद्दर पठान, दिलीप सोनोने, नाना नागमोते, अविनाश भडांगे, महेश राऊत, विनोद वानखडे, शरद वानखडे, मुकुंद पुणसे, पंकज देशमुख,संदीप आमले, संजय चौधरी, अभिजीत बोके, जितेंद्र ठाकूर, शैलेष काळबांडे, प्रतिभाताई गौरखेडे, अनिकेत देशमुख, वैभव वानखडे, रितेश पांडव, वीरेंद्र भट, किशोर चांगोले, सतीश पोजगे, रवी हांडे, संजय मार्डीकर, संजय कळसकर, सचिन ठोके, सुनील जुनघरे, प्रणव गौरखेडे, नरू विघ्ने, अंजली ठाकरे आदी मान्यवर सहकुटुंब उपस्थित होते. तसेच शहरातील भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

         अविनाश गोंडाणे 
             अमरावती 
         9923264193

0 Response to "समतेचा आणि भक्तीचा वारसा जपणाऱ्या रुख्मिणी मातेच्या पालखीचे अंबानगरीत जल्लोषात स्वागत."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article