विभागीय स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुखपदी क्रिष्णा शामराव पंचबुद्धे यांची निवड
मंगलवार, 23 जून 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील धारगाव जिल्हापरिषद क्षेत्रातील गाव खुर्शीपार(गुंथारा) येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत कार्यरत पदवीधर शिक्षक श्री. क्रिष्णा शामराव पंचबुद्धे यांची विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदावर निवड झाली आहे.
जिल्हा परिषद नागपूरच्या पंचायत समिती हिंगणा अंतर्गत येणाऱ्या मोहगांव केंद्रासाठी त्यांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री.क्रिष्णा पंचबुद्धे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, सहकारी शिक्षक, मार्गदर्शक तसेच वरिष्ठ अधिकारी यांना दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे खुर्शीपार गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Response to "विभागीय स्पर्धा परीक्षेतून केंद्रप्रमुखपदी क्रिष्णा शामराव पंचबुद्धे यांची निवड"
एक टिप्पणी भेजें