विविध सामाजिक संघटने द्वारा 23 जुलैला तुमसर बंद.
बुधवार, 22 जुलाई 2026
Comment
२३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला तुमसरात पाठिंबा; व्यापारी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होन्याचे आव्हान.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर (प्रतिनिधी ) : दिल्ली येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, या बंदला तुमसर शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे विविध सामाजिक संघटनांनी आव्हान केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार राज्यभर महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच लोकशाही मार्गाने निषेध नोंदविण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक, सामाजिक
संघटना, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यासंदर्भात तुमसरात शहरातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध आघाड्यांच्या प्रतिनिधींनी बंद यशस्वी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून,मातोश्री लान नवा बसस्टाप ते तहसील कार्यालय तुमसर येथे शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने बंद पाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सर्वांनी शांततेच्या मार्गाने सहभाग व्हावा असेही आवाहन विविध सामाजिक संघटना, CJP , भारतीय विधार्थी समाज परिषद,सर्व शिव,फूले,शाहु आंबेडकर, सामाजिक संघटना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिक माहितीसाठी संपर्क करण्याची आव्हान केले आहे आहे.
0 Response to "विविध सामाजिक संघटने द्वारा 23 जुलैला तुमसर बंद."
एक टिप्पणी भेजें