कविता (चाल - स्वतंत्र)
बुधवार, 22 जुलाई 2026
Comment
बोल बाबाचे तुम्ही ,आजही आठवा
संघर्ष दाखवा, तुम्ही एकी दाखवा (धृ)
धम्मरथ एकीचा, तुम्ही चालवा !
वाद आपसातील, तुम्ही मिटवा !!
छातीवरी हे एक ~निशान दाखवा (१)
भाऊ भाऊ मिळू , एका ठाई येवू !.
निशाण एकीचे, ही हाती घेऊ !!
संघर्ष एकीचा हा~ तुम्ही दखवा (२)
नेता दिल्लीत ,एकीने पाठवा !.
दिल्लीचे शिखर,हे तुम्ही गाठवा !!
भीमशक्ती ही~एकीने अशी नटवा (३)
ओढाताण करुन, रथ जायी फसुन !.
वैरी त्याहूनी तो, जातो बसून !!
निळे निशान हे~एकीचे दाखवा (४)
करु नको इथे, गौतम हेवा दावा !.
संघर्ष एकीचा , हा, सदैव ठेवा !!
निळे निशान हे~एकीचे दाखवा (५)
(कवी पञकार गौतम धोटे)
(दोन्ही कर जोडूनी माघवा संदेश माझा तुम्हा हा नवा
स्वीकारुनी तुम्ही तो घ्यावा घरोघरी संदेश आता द्यावा
भीम बुध्दा चरणी, गौतमा करी बघा मागणी गौतमा )
0 Response to "कविता (चाल - स्वतंत्र)"
एक टिप्पणी भेजें